Harshvardhan Sapkal : भाजप म्हणजे नेते गिळणारी चेटकीण ? सपकाळांचा खळबळजनक आरोप

Top Trending News    10-Jun-2025
Total Views |

harsh
 
नागपूर - ( Harshvardhan Sapkal ) काँग्रेसमुक्त भारत या भाजपच्या अजेंड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. भीती आणि लालसेपोटी काँग्रेस चे बरेच जण महायुतीत जात आहेत. त्यामुळे, काँग्रेसमुक्त भारत असे म्हणणारा भाजप आता कॉंग्रेसयुक्त होत आहे. यावरून भाजप हे काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते नागपुरात सवोंदयी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यास आले असता पत्रकारांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरीकेने दिलेल्या अहवालात 'हेट स्पीच'मध्ये मोदींचे नाव आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरचा लेखा जोखा, अडाणी अंबानी यांची संपत्ती किती वाढली, एचएम इंडेक्स हे सर्व उलट चक्राने फिरण्याचे संकेत ( Harshvardhan Sapkal ) आहेत.
 
मोदी सरकारने गेल्या 11 वर्षाच्या सत्ताकाळाचा लेखा जोखा मांडला ( Harshvardhan Sapkal ) पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांच्या वतीने रेकॉर्ड्स मांडला पाहिजे. हॅपी इंडेक्स, बेरोजगार, गरीब गरीब का झाला, 2014 मध्ये 2 कोटी नोकरी देऊ, शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, प्रत्येक माणसाच्या खिशात 15 लाख ही आश्वासने कुठे गेली. पेट्रोल दरावर घसा कोरडे करणारे अण्णा हजारे, बाबा रामदेव यांनी लोकपालाच काय झाल, याच उत्तर ( Harshvardhan Sapkal ) दिल पाहिजे.
 
निवडणूक आयोगाच्या कामात गडबड
 
निवडणूक आयोगाचे काम हे अमित शाह यांच्या सूचनेनुसार सुरु आहे. फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वीच पुराव्यानिशी निवडणूक आयोगात गेले होते. 5 वाजतानंतर 8.74 टक्के मतदान कसे वाढते ? अशी तक्रार आयोगाकडे आहेच. मतांवर डल्ला मारणारा सुत्रधार किरण कुलकर्णी आहे. संध्याकाळी 7 नंतर 74 लाख मतदान कस वाढले, हे ओपन सिक्रेट आहे. निवडणूक आयोगाने आम्ही मागणी केल्यानंतर नियम बदलले. त्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे तिथे असलेल्या कुलकर्णी यांची नाकों टेस्ट करावी. ही मॅच फिक्सींग आहे. मतांची चोरी आहे. तर, ते पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाकडे अगोदरच लेखी तक्रार आहे. शिवाय, संसदेत राहूल गांधी यांनी राजकारण बाजुला ठेवून लोकशाही वाचवण्यासाठी चौकशीचा आदेश द्या, अशी मागणी केल्याकडेही सपकाळ ( Harshvardhan Sapkal ) यांनी लक्ष वेधले.
 
जो साथ देगा वो साथी
 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत स्थानिक पातळीवर सर्वाधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यावेळी साथ देतील ते सहकारी, असे संकेत सपकाळ यांनी दिले. दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी तेच निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आहे. मागील काळात भाजपचा अहंकार होता. त्यातल्या त्यात एकत्रित व्यासपीठावर येतांना राजकारण केल जात. राज्यात आज अनेक समस्या आहेत. शेतकरी मुद्दे, पीक कर्ज, कर्जाचे पुर्नगठन बी बियाणांचा तुटवडा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50हजार रूपयांची मदत आदी प्रश्न आहेत. या पासून लक्ष विचलीत करण्यासाठी हे सगळ सुरू आहे. माध्यमांना यावर संताप का येत नाही ? निवडणूक आयोग हे माध्यमांकडे राहुल गांधी का आरोप करतात, असा प्रश्न करतात. निवडणूक आयोगाला चौथ्या स्तंभावर आक्षेप आहे, हे निषेधार्थ आहे.'
 
सरकारची खेळी
 
तीन तिघाडा आणि काम बिघाड असे सरकार लोकाभिमुख निर्णय घेत नाही. यामुळे महाराष्ट्राचा वाटोळ होईल. पास नापासचा खेळ करीत फडणवीस बुध्दीभेद करीत असल्याचा आरोप सपकाळ यावेळी केला. तर, पडळकर आणि भिडे गुरूजी तणाव निर्माण करण्यासाठी काम करतात. या दोघांना फडणवीस यांनी नवा अजेंडा सोपविल्याचा आरोपही त्यांनी केला. बच्चू कडूंचे उपोषण किती दिवस टिकते, यानंतरच कॉग्रेस पक्ष निर्णय घेईल असे संकेतही त्यांनी दिले.