Lovers Tragedy Nagpur : जिवलग मैत्रिणीने अचानक जीवन संपविले, प्रियकरांनी घेतली जळत्या चितेत उडी

Top Trending News    10-Jun-2025
Total Views |

Lovers Tragedy Nagpur
 
नागपूर : ( Lovers Tragedy Nagpur ) आज संपूर्ण देशात वटसावित्रीचा उत्साह आहे. सहजीवनाची साथ निभावणारी प्रत्येक व्रतकैवल्य करणारी स्त्री आपल्या सौभाग्याच्या अखंडतेसाठी वडाचे पूजन करते आहे. धार्मिक परंपरेनुसार बघितल्यास सात जन्मी हाच नवरा मिळावा असा संकल्प यामाध्यमातून स्त्रिया करणार आहेत. मात्र अशा महत्त्वाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला विलक्षण प्रेमाची अनुभूती करून देणारा एक धक्कादायक प्रकार नागपूर जवळील कन्हान येथे घडला आहे. प्रेयसीने काहीही न सांगता अचानक जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तिच्या जिवलग प्रियकराने चक्क जळत्या चितेत उडी घेण्याचा प्रयत्न केला. जीवलग मैत्रिणीचे असे अचानक निघून जाणे प्रियकराला सहन झाले नाही. कन्हान नदीतिरी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना ही घटना घडली. मात्र, अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या लोकांनी तत्काळ त्याला बाहेर काढले आणि उपचारार्थ रुग्णालयात भरती केले. अनुराग (22) रा. कन्हान असे त्या युवकाचे नाव ( Lovers Tragedy Nagpur ) आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी नोंद केली आहे.
 
प्राची (काल्पनिक नाव) पदवीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. अनुरागची तिच्याशी घट्ट मैत्री होती. कुठल्यातरी कारणावरून प्राचीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. माझ्या मृत्यूनंतर अनुरागला कुणी त्रास द्यायचा नाही, असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. या घटनेमुळे अनुरागला मोठा धक्का बसला. प्राचीच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. ती पोकळी कोणीही भरुन काढू शकत नाही, असा त्याचा समज झाला. अनेकांनी त्याची समजूत घातली. मात्र, तो समजण्यापलीकडे होता.
 
सोमवारी दुपारच्या सुमारास कन्हान नदीच्या घाटावर प्राचीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ( Lovers Tragedy Nagpur ) झाले. घाटावर अनुरागसुद्धा उपस्थित होता. चिता जळल्यानंतर सहभागी लोक परतीला निघाले. हीच संधी साधून अनुरागने जळत्या चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा भाऊ आणि काही लोकांच्या धावपळीमुळे त्याचा जीव वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच रूग्णालयातील डॉक्टरांकडून अनुरागच्या तब्येतीची माहिती ( Lovers Tragedy Nagpur ) घेतली.
 
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
 
प्राचीने राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास बांधून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.8) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हनुमाननगर, कन्हान येथे घडली. अंशिका नितीन खोब्रागडे (19) रा. हनुमाननगर, कन्हान असे मृत तरुणीचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात ( Lovers Tragedy Nagpur ) आहे. प्राप्त माहितीनुसार, अंशिकाने खोलीत आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळताच कुटुंबीयांनी लागलीच तिला गळफास अवस्थेतून खाली उतरवून उपचाराकरीता रुग्णालयात नेले. मात्र, येथील डॉक्टरांनी अंशिका तपासून मृत घोषित केले. कन्हान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविला. सोमवारी (दि.१) शवविच्छदनाअंती अंशिकाचे पार्थिव नातेवाकांच्या सुपूर्द केले असता पार्थिवावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंशिकाच्या पश्चात आई-वडील, लहान बहिण, असा आप्तपरिवार आहे. घटनेचा पुढील तपास कन्हान पोलिस करीत आहे.