Orange revolution : एआयच्या मदतीने एका झाडाला 1500 फळे, संत्रा क्रांतीकडे स्पेनच्या शास्त्रज्ञांचा लक्षवेध

Top Trending News    10-Jun-2025
Total Views |

santra
 
अमरावती जिल्ह्यात ( Orange revolution ) अचलपूर येथील खरपी या छोट्याशा गावात विजय बिजवे यांच्या शेतात हा चमत्कार झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतका संत्रा बहरलाय की सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. एका झाडावर 1000 ते 1500 फळे लागली आहे. आता परिस्थिती विपरीत असतांनाही लागली आहेत. लगतच्या शेतात कुठेही संत्री दिसत नसताना याच शेतात एका झाडाला 1000 ते 1500 फळे लागली आहेत. यावर्षी आमच्या उत्पन्नात निश्चित भर पडेल, असा विश्वास विजय बिजवे यांनी व्यक्त केला. खरपी गावातील विजय बिजवे यांच्या शेतात सुरू असलेले हे काम देशातील पहिलाच प्रयोग असल्याचेही डॉ. गोसावींनी सांगितले. विदर्भातील संत्री पुन्हा एआय तंत्रज्ञानामुळे जोमात बहरतील, असा विश्वास देखील या तंत्रज्ञानातील नाशिक येथील एआय आणि कृषीतज्ज्ञ डॉ. भूषण गोसावी यांनी व्यक्त केला.
 
विजय बिजवे यांच्या शेतात इंटरनेट प्रणालीवर चालणारे सेन्सर उभारण्यात ( Orange revolution ) आले आहे. या सेन्सर द्वारे उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण 8 एकर शेतात लागलेल्या संत्रा पिकाचे निरीक्षण केले जाते. विशेष म्हणजे या प्रणालीद्वारे, शेतातील 1200 झाडांचे संपूर्ण व्यवस्थापन या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. किडीचे व्यवस्थापन सुद्धा या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. शेतात ओलावा किती ? किती पाण्याची गरज आहे, हे सांगणारे सेन्सर लावण्यात आले आहे. विशेष बाबा म्हणजे या सेन्सरवर सोलर पॅनल लावले असल्याने वातावरणातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता कळते, अशी माहिती डॉ. भूषण गोसावी यांनी दिली.
 
विदर्भातील संत्रा उत्पादन क्षेत्रातील नविनतम प्रयोग 
 
कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संवाद विदर्भातील संत्रा उत्पादन क्षेत्रातील नविनतम प्रयोग व तंत्रज्ञानाचा आढावा घेण्यासाठी स्पेनमधील कृषी तज्ज्ञांनी नुकताच वरुड तालुक्याचा अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व युरो सीमीलीआजचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जुआन अँटोनिओ यांनी केले. त्यांच्यासोबत स्पेनचे तज्ज्ञ जेवीएर कॅनो यांचाही सहभाग होता. भारताचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून ( Orange revolution ) काही दिवसांपूर्वी भारताचे शिष्टमंडळ स्पेनच्या दौऱ्यावर गेले होते. याच दरम्यान त्यांनी स्पेनच्या कृषी शास्त्रज्ञांना विदर्भातील संत्रा उत्पादन पाहण्याचे ( Orange revolution ) आमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
 
भारतात आलेल्या स्पेनच्या शास्त्रज्ञांनी खासकरून वरुडच्या शेतांमध्ये होणाऱ्या उच्च दर्जाच्या संत्रा उत्पादनाची माहिती घेतली आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळणाऱ्या उत्पादन व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. दौऱ्याची सुरुवात वरुड येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखडे यांच्या निवासस्थानी स्वागत समारंभाने झाली. यावेळी अॅग्रो व्हिजनचे सचिव रवींद्र बोरटकर, डॉ. सी. डी. माई, सह्याद्री कृषी फार्म, नाशिकचे पवन पाटील, तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. शशांक भराड, डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. उज्ज्वल राऊत, डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. अजय गाठे, डॉ. राजू घावडे, डॉ. सोनल नागे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा वानखडे कुटुंबियांनी सत्कार केला.
 
स्पेनच्या शास्त्रज्ञांनी वरुड तालुक्यातील बेनोडा येथील टावरी, टेंभुरखेडा येथील गणेश वांदे, तिवसाघाटचे उध्दव फुटाणे व डॉ. शांतीभुषण उमेकर यांच्या शेतांना भेट दिली. शेतात एआय व सेन्सर टेक्नॉलॉजीचा वापर ( Orange revolution ) करून संत्रा उत्पादनात कसे बदल घडवले जात आहेत, याची प्रत्यक्ष अनुभवातून माहिती त्यांनी घेतली. दौऱ्यात स्थानिक मान्यवर, कृषी क्षेत्रातील अभ्यासक आणि संत्रा उत्पादकांसह अनेक पदाधिकारी सहभागी ( Orange revolution ) होते.