Air India Crash : घराचं ऋण दोघांचं होतं, पण फरक इतकाच होता, अपघाती मृत्यू पावलेल्या रक्षा यांच्या अखेरच्या पोस्टने वेधले लक्ष

Top Trending News    12-Jun-2025
Total Views |
 
air

मुंबई - ( Air India Crash ) पतीच्या निधनानंतर त्या मायदेशी भारतात परतल्या. त्यांच्यासोबत नातू रूद्रही होता. परंतु, पतीच्या आत्म्याच्या शांतीसाठी लंडनमधील वेलिंगबरो येथील हायफिल्ड कम्युनिटी सेंटर येथे आयोजित श्रद्धांजली सभेसाठी लंडन गाठण्यासाठी त्यांनी आजचा म्हणजेच गुरुवाचा मुहूर्त निवडला आणि घात झाला. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात रक्षा मोढा व रूद्र मोढा यांचे निधन झाले. महत्त्वाचे म्हणजे अगदी एक दिवसांपूर्वीच फेसबूक वॉलवर त्यांनी गुजराथीत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात भावनिक अर्थ लपलेला होता. घराचं ऋण दोघांचं होतं, पण फरक इतकाच होता छपराने दाखवून दिलं - मी सावली दिली, आणि पाया म्हणाला - मी आधार दिला, पण गुपचूपच ! असे लिहिले आहे. त्यांच्या आयुष्याचा पाया म्हणजेच भारत आणि अर्थातच गुजरात ठरला तर सावली देणारे छप्पर लंडनमधील वेलिंगबरो शहर ( Air India Crash ) ठरले.

रक्षा मोढा यांचे फेसबूक खाते ( Air India Crash ) बघितल्यास त्यांनी विविध भावनिक कविता, लेख पोस्ट केल्या असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ असा की त्यांना साहित्याची आणि मातृभाषेची गोडी होती. १९८९ मध्ये युकेला गेले रक्षा मोढा यांचे पती किशोरभाई मोढा यांनी पूजा केटरर्सची स्थापना केली. थेट लंडनच्या धरतीवर भारतीय जेवणाचा आस्वाद देण्याचा त्यांचा प्रयत्नाला अल्पावधीत नावलौकिक मिळाले आणि हळूहळू लंडनमधील भारतीय त्यांच्यासोबत जोडत गेले. प्रत्येकाच्या जीभेवरची चव ओळखून भारतीय मेजवानीवचा पुरेपुर आनंद देण्याचा किशोर मोढा यांनी प्रयत्न केलाच मात्र शुन्यातून उभारलेल्या व्यवसायाला चालना देण्याचे कामही गृहिणी या नात्याने रक्षा मोढा यांनी हिरीरीने ( Air India Crash ) केले.
 
२६ एप्रिल २०२५ रोजी किशोर मोढा यांचे निधन झाले. किशोर आणि रक्षा मोढा यांना किशन, अंजली आणि चिराग अशी तीन अपत्य आहेत. तर अपघातात मृत्यू पावलेला रुद्र आजीसोबत प्रवास करत होता. या अपघातात अनेकांनी आपली आई, वडील, सासू-सारसे, मुलगी-मुलगा, नातू गमवले आहेत. अपघाताचे वृत्त जसेजसे देशभर पसरले असे दु:खाचे सावट निर्माण झाले. मूळ लंडनमध्ये स्थायिक असलेले भारतीय कुटुंब प्रवासात अक्षरश: नाहिशे झाले आहेत. त्यांच्या आप्तजनांसाठी ( Air India Crash ) आजचा दिवस काळा ठरला.

अपघातानंतर, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था आणि माहितीसाठी विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी अपघाताची पुष्टी केली आणि म्हटले आहे की, अहमदाबाद लंडन गॅटविक येथून उड्डाण करणारे एअर इंडियाचे फ्लाइट 171 आज एक दुःखद अपघात झाला आहे, याची मी अत्यंत दुःखाने पुष्टी करतो. या विनाशकारी घटनेत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांसोबत आमचे विचार आणि तीव्र संवेदना ( Air India Crash ) आहेत.
 
सध्या आमचे प्राथमिक लक्ष सर्व बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना सर्व आवश्यक मदत आणि काळजी प्रदान करण्यासाठी आमच्या शक्तीनुसार सर्वकाही करत आहोत. अधिक पुष्टीकृत माहिती मिळताच पुढील अपडेट्स शेअर केले जातील. माहिती शोधणाऱ्या कुटुंबांसाठी एक आपत्कालीन केंद्र सक्रिय करण्यात आले आहे आणि मदत पथके स्थापन ( Air India Crash ) करण्यात आली आहेत.

625 फूट उंचीवरून विमान कोसळले

एव्हिएशन ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटराडार 24 ने एक्स (जुने ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रारंभिक एडीएस-बी डेटावरून असे दिसून आले की विमान कमाल 625 फूट उंचीवर पोहोचले होते, तर अहमदाबाद विमानतळाची उंची सुमारे 200 फूट आहे. त्यानंतर विमान -475 फूट प्रति मिनिट या उभ्या वेगाने खाली पडू लागले, जे गंभीर तांत्रिक बिघाड किंवा यांत्रिक बिघाड दर्शवते. तपास सुरू, मदतकार्य तीव्र सध्या, डीजीसीएने घटनेची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. विमान अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी एक तांत्रिक पथक तैनात करण्यात आले आहे. सरकार, एअर इंडिया आणि सर्व संबंधित एजन्सी एकत्रितपणे मदत आणि पुनर्वसन कार्याला प्राधान्य देत आहेत.