गुजरात ( Air India Plane Crash ) येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. हे विमान टेकऑफ केल्यानंतर 5 मिनिटांनी या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले आहे, जिथे कॅन्टीन आहे. तेथे वैद्यकीय विध्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था असते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये सुमारे 50 ते 60 डॉक्टरांसोबत वैद्यकीय विद्यार्थी जेवण करत होते. तेव्हा अचानक विमान त्या इमारतीवर येऊन कोसळला.
या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील सापडले आहे. ते अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात होते. ते त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात त्यांचा सीट क्रमांक 12 होता तर, ते एकटेच प्रवास करत होते. लंडनहून त्यांचे सहकारी नितीन भारद्वाज यांनी माहिती दिली की, या घटनेनंतर ते विजयभाईंशी काहीच संपर्क झाला नाही, ते आमचा फोन उचलत ( Air India Plane Crash ) नाहीत.
अहमदाबाद विमानतळ बंद
अपघातानंतर, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था आणि माहितीसाठी विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.