Fake Gujarat Crash Video : 30 सेकंदापूर्वीचा व्हिडीओ सांगून शेअर केला चक्क नेपाळ विमान अपघातातील व्हिडीओ

Top Trending News    12-Jun-2025
Total Views |

fake
 
अहमदाबाद - ( Fake Gujarat Crash Video ) गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग 737 कोसळले. या घटनेत देशाची प्रचंड मोठी हानी झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण लंडनच्या दिशेने कुच केलेल्या विमानात केवळ अहमदाबादमधीलच प्रवासी नव्हते तर देशभरातील प्रवाश्यांचा सहभाग होता. अहमदाबादच्या मेघानीनगर विमान क्रॅश झाले तेव्हा या भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्या. काळ्या धुराचे ढग दूरवरून दिसून येत होते. या विमानात 242 प्रवासी होते. यातील एक सुरक्षित असून, इतर सर्वांचा दुर्देवी मृत्यू झाला.
 
महत्त्वाचे म्हणजे ही घटना घडताच सोशल मिडियावर व्हारयल झालेल्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये पिवळी टीशर्ट घातलेला मुलगा दिसतो. विंडोसीट वर बसलेला आहे. आनंदाने प्रवास करतोय. अवघ्या आठ सेकंदात विमानात बसलेल्या प्रवाश्यांवर काळ घाला घालतो. होत्याचे नव्हतं होते. आणि क्षणार्धात विमान आगीच्या लोळात पडलेले त्यात दिसते. महत्त्वाचे म्हणजे ज्या समाजकंटकाने व्हिडीओ शेअर केला होता, त्याने तो व्हिडीओ अहमदाबादच्या अपघातातील असल्याचे म्हटले होते. निश्चितच आज भारतीय सुन्न झाले आहेत. अपघातात कुणी आपला गेला असेच दु:ख प्रत्येकाच्या मनात असताना समाजकंटकाकडून दाखविण्यात आलेला हा उनाडपणा ( Fake Gujarat Crash Video ) होता.
 
व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला. प्रत्येकजण तो शेअर करू लागले. महत्त्वाचे म्हणजे अहमदाबादच्या अपघातातही असेच घडले असेल का हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनामनात होता. परंतु, हा व्हिडीओ अहमदाबादच्या घटनेतील नसून नेपाळमधील विमान अपघातातील असल्याचे स्पष्टीकरण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिले आहे. ही संस्था भारत सरकारची एक प्रमुख संस्था असून, जी सरकारची धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि यश यांची माहिती छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत पोहोचवते. हे सरकार आणि माध्यमांमध्ये एक दुवा म्हणून काम करते, तसेच माध्यमांमध्ये व्यक्त झालेल्या लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल सरकारला माहिती देते. पीआयबीने स्पष्टीकरण देताच ज्या गतीने व्हिडीओ व्हायरल झाला. त्याच गतीने पीआयबीचे ट्विट देखील व्हायरल झाले ( Fake Gujarat Crash Video ) आणि त्यानंतर भारतीयांनी व्हिडीओवर विश्वास ठेवणे सोडले.
  
 
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. चित्रात विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसते. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत ( Fake Gujarat Crash Video ) आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे.
 
PIB ने सांगितली त्या वायरल होणाऱ्या व्हिडिओची सत्यता -