नवी दिल्ली : ( Air India Emergency Landing ) गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया या विमान कंपनीचे शेअर झपाट्याने घसरले आहेत. यावरूनच कंपनीचे मानांकन देखील घसरल्याचे जाहीर होते आहे. महत्त्वाचे म्हणजे या अपघातानंतर एअर इंडिया कंपनीच्या विमानांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवासांनी पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते. अशात एअर इंडियासाठी शुक्रवार देखील थोडा रिस्की ठरल्याचे दिसून येते आहे. कारण शुक्रवारी थायलंडहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर त्याचे आपत्कालीन लँडिंग ( Air India Emergency Landing ) करण्यात आले.
या विमानाने थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळाने सांगितले की, एअर इंडिया एआय 379 या विमानात 156 प्रवासी होते. विमानाने उड्डाण भरल्यानंतर बाथरूमच्या भिंतीवर बॉम्बची धमकी असल्याचे दिसून आले त्यानंतर पायलटने इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागितली. प्राथमिक तपासणीनंतर अधिकाऱ्यांना एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब सापडला नाही, त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली.
शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता (0230) नवी दिल्ली गंतव्यस्थान असलेल्या फुकेत विमानतळावरून विमान निघाले. तथापि, फ्लाइटराडार 24 ट्रॅकिंग डेटाने दाखवल्याप्रमाणे, ते थाई बेटावर परत येण्यापूर्वी अंदमान समुद्रावर बराच प्रदक्षिणा घालत होते. अखेर मार्ग मोकळा होताच विमानाचे लँडिंग करण्यात आले. अहमदाबादच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर विमानाने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंचेचे वातावरण आहे. अशात एअर इंडिया साठी गुरुवार तर घातला ठरलाच परंतु शुक्रवार देखील चिंतेचा ठरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.