मुंबई : ( Gujarat Air Tragedy ) राजस्थानातील बालोत्रा जिल्ह्यातील अरबा दुदावाता गावातील खुशबू कंवरसाठी हा प्रवास नवीन आयुष्याची सुरुवात ठरणार होता, परंतु नियतीने काही वेगळेच ठरवले होते. खुशबू राजपुरोहित लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. अहमदाबादमध्ये ती एअर इंडियाच्या विमान अपघाताची बळी ठरली. खुशबू ही बालोत्रा जिल्ह्यातील अरबा दुदावाता गावातील मदनसिंग राजपुरोहित यांची मुलगी आहे.
18 जानेवारी रोजी लुणी येथील खाराबैरा पुरोहित येथील रहिवासी विपुल सिंग राजपुरोहित यांच्याशी तिचा विवाह झाला ( Gujarat Air Tragedy ) होता. विपुल लंडनमध्ये डॉक्टर आहे. व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर, खुशबू पहिल्यांदाच तिच्या पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. खुशबू लुणी येथील तिच्या सासरच्या घरी राहत होती. बुधवारी, ती गुरुवारी विमान पकडण्यासाठी गाव सोडून अहमदाबादला निघाली. हा प्रवास इतका वेदनादायक वळण घेईल याची कल्पना कोणीही केली नव्हती. महत्त्वाचे म्हणजे अहमदाबाद लंडन गॅटविक येथून उड्डाण करणारे एअर इंडियाचे फ्लाइट 242 प्रवासी होते तर 7 क्रू मेंबर्स होते. यातील एका व्यक्तीचा सोडला तर बाकी सर्वांचाच मृत्यू झाला आहे.