अहमदाबाद : ( Gujarat Life Saver Pilot ) लंडनच्या गॅटविक विमानतळावर दुपारी 1:39 वाजता उड्डाण केल्यानंतर 5 मिनिटांतच एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर कोसळले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या म्हणण्यानुसार, हे उड्डाण कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते, ज्यांना एकूण 9,300 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. कॅप्टन सभरवाल यांना 8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर त्यांच्या सह-वैमानिकाला 1,100 तासांचा अनुभव होता.
विमान 625 फूटावरून 475 फूट प्रति मिनिट वेगाने कोसळल्याने, वैमानिकांना प्रतिक्रिया देण्यासाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ मिळाला. तथापि, एटीसीशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एटीसीच्या म्हणण्यानुसार, विमानाने अहमदाबादहून धावपट्टी 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यांनी एटीसीला मेडे कॉल केला, परंतु एटीसीने केलेल्या त्यानंतरच्या कॉलला विमानाने प्रतिसाद दिला नाही. मृत्यूला कवटाळताना ची स्थितप्रज्ञता. ( Gujarat Life Saver Pilot ) पायलट सुमित सभरवाल यांची त्यांना मिळालेल्या ४० सेकंदातली समय सूचकता.
संकटाच्या काळात, एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या स्थितीत कधीच गडबडून न जाता मन स्थिर ठेवत स्थितप्रज्ञ, याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर कुठलाही एका टोकाचा परिणाम होऊ न देता मन मध्यबिंदूवर स्थिर करत आपण परिस्थितीशी मुकाबला केला पाहिजे, व उद्भवलेल्या समस्येवर आलेल्या संकटावर उत्तमातला उत्तम पर्याय, सोल्युशन आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच आपण विचलित न होता स्थितप्रज्ञ अवस्थेला जाण्याचा सल्ला आपल्या महाभारतात भगवान श्रीकृष्ण ने दिला ( Gujarat Life Saver Pilot ) आहे.
अहमदाबाद जवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमाना ची दुर्घटनेतील मुंबई येथील पवईचे निवासी असलेले पायलट सुमित सभरवाल यांना जेव्हा लक्षात आलं की आता विमान उंचीवर नेणे अशक्य आहे आणि 304 किमी प्रति तासाच्या वेगाने ते जमिनीकडे झेपावत आहे केवळ 600 - 900 फुटाचे अंतर जमिनीशी विमानाच्या टकरावण्याचं बाकी असताना त्यांनी आजूबाजूला नजर फिरवत जिथे कमीत कमी डॅमेज होईल ( Gujarat Life Saver Pilot ) अशा ठिकाणी ते विमान वळवलं तिथे ते विमान पडलं.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, विमानात मोठा बिघाड असल्याचे समजताच कॅप्टन सबरवाल यांनी दाखवलेली समय सूचकता महत्त्वाचे ठरल्याचे देखील तज्ञ सांगतात. विमानाने उडान केल्यानंतर जर दाट लोकवस्तीमध्ये हे विमान कोसळले असते तर साधारण पंचवीस हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू या घटनेत झाला असता. परंतु, पायलट सुमित सभरवाल यांनी स्थितप्रज्ञ स्वभावाचे दर्शन घडवत ( Gujarat Life Saver Pilot ) विमान थोडे रिकाम्या जागेत नेण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.