Final Flight Clip : आम्ही विमानात चढणार आहोत, ब्रिटिश इन्फ्युएन्सरचा शेवटचा व्हिडीओ

Top Trending News    14-Jun-2025
Total Views |

british 
 
सध्या 53 पैकी 2 ब्रिटिश नागरिकांची ( Final Flight Clip ) इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानात चढण्यापूर्वी बनवलेल्या या व्हिडीओमध्ये जेमी आणि फिओंगल ग्रीनलॉ मजा करताना आणि भारताबद्दल त्यांचे विचार शेअर करताना दिसत आहेत. जेमीच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघेही बोलत असल्याचे दिसत आहे. फिओंगल म्हणतात, 'आम्ही विमानतळावर आहोत. आम्ही विमानात जाणार आहोत. भारताला अलविदा.' यावर, जेमी त्याच्यासोबत असेही म्हणतो, 'गुडबाय.. इंग्लंडला परत जाण्यासाठी आपल्याला अजून 10 तासांची फ्लाईट आहे.' यानंतर, फिओंगल त्याला विचारतो की त्याची सर्वांत मोठी कामगिरी कोणती आहे?, ज्यावर जेमी हसतो आणि म्हणतो की त्याला माहीत नाही. काही वेळ संभाषणानंतर, फिओंगल म्हणतो की मी आनंदाने आणि फक्त आनंदाने परत जात आहे.
 
यासोबत व्हिडीओ संपतो. फिओंगलने याआधी आणखी एक व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये तो म्हणतो, 'तर ही आमची भारतातली शेवटची रात्र आहे. आज आम्हाला एक जादूचा अनुभव आला आहे. आमच्यासोबत अनेक मनाला भिडणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. लवकरच आम्ही हे सर्व जोडून एक व्लॉग बनवणार आहोत. मला वाटते की हा माझा पहिला व्लॉग ( Final Flight Clip ) असेल. आम्ही आमच्या संपूर्ण भारत प्रवासाबद्दल हे बनवू.'
 
आगीमुळे विमानाचे लोखंड वितळले, परंतु भगवद्गीतेवर ओरखडाही नाही
 
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या भयानक अपघाताच्या घटनेनंतर बचावकार्य आता जवळजवळ संपले आहे. बचावकार्यादरम्यान, स्फोटाच्या ज्वाळांनी विमानाचे आणि आजूबाजूच्या वस्तूंचे किती नुकसान झाले आहे हे स्पष्टपणे दिसून येत होते. या दरम्यान, बचाव पथकाला एक भगवद्गीता सापडली. कदाचित एखादा प्रवासी अहमदाबादहून लंडनला हा पवित्र ग्रंथ घेऊन प्रवास करत असावा. जिथे सर्व सामान जळून खाक झाले होते, तिथे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचता येईल ( Final Flight Clip ) एवढ्या चांगल्या स्थितीत आहे.