पुणे : ( Maval Bridge Tragedy ) पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल रविवारी कोसळला. त्यामुळे अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. 2 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढण्याची शक्यता आहे.
इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी ( Maval Bridge Tragedy ) होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. रविवारी दुपारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर रविवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक हा पूल कोसळला आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात पडले. माहिती मिळताच घटनास्थळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल ( Maval Bridge Tragedy ) झाले.
रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी
पूल कोसळल्यानंतर 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी तारांबळ उडाली. काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. तसेच माहिती मिळताच अग्निशमन दलही पोहोचले. या ठिकाणी काही पर्यटक अडकले, त्यांना वाचवण्यात आले. या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघ्याची गर्दी ( Maval Bridge Tragedy ) झाली होती.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नाही
कुंडमळा हे ठिकाण पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक आहे. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही. असे असले तरी प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असे असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना ( Maval Bridge Tragedy ) करण्यात आली नाही.
6 जणांना वाचवण्यात यश
इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ६ जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Maval Bridge Tragedy ) आहे, असे त्यांनी सांगितले.
शूटिंग दरम्यान बोट उलटली, 30 बचावले
शिवमोगा - ऋषभ शेट्टी याच्या 'कांतारा २' या कन्नड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सतत समस्या येत आहेत. आता चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक बोट उलटली. अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि 30 क्रू मेंबर्स या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, शिवमोगा जिल्ह्यातील मस्ती कट्टे भागातील मणि जलाशयात चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली. कॅमेरे आणि इतर मशीन्स पाण्यात बुडाले असून, नुकसानीचे अद्याप मूल्यांकन झालेले नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या तीर्थहल्ली पोलिसांच्या मते, बोटीतील लोक सुरक्षितपणे वाचले. थिएटर कलाकार रामदास पुजारी म्हणाले की दक्षिण कन्नडच्या आत्म्यांवर चित्रपट बनवणे नेहमीच धोकादायक ( Maval Bridge Tragedy ) असते.
एकाच कुटुंबातील 5 मुलांना जलसमाधी
हैदराबाद - तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील बसरा येथे गोदावरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील 5 तरुणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. बसरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणाले की, गोदावरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. आम्ही पाचही मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. त्यांनी सांगितले की, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या चौकशीच्या आधारे हा अपघात कसा घडला हे शोधले जात ( Maval Bridge Tragedy ) आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेची तात्काळ दाखल घेतली आहे. त्यांनी सोसिअल मीडिया च्या X वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. ते म्हणाले - पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.