Shalarth ID Scam : शिक्षण विभागात लाखोंचे व्यवहार ! चौकशीला कोणी मारला ब्रेक ? गाणारांचा सरकारवर थेट हल्ला

Top Trending News    15-Jun-2025
Total Views |
 

shalarth
 
नागपूर - (Shalarth ID Scam) राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यातला मुख्य सूत्रधार कोण आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. या प्रकरणात चौकशीसाठी दाखल विशेष तपास पथकाने संस्थाचालकांच्या मालमत्ता खंगाळल्या तर सूत्रधार सापडू शकतो. मात्र, एसआयटी यात दिरंगाई करीत असल्याची आगपाखड करीत माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र पाठविले आहे. गाणार हे भाजपचे आमदार होते. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारलाच घरचा आहेर दिल्याचे बोलले जात (Shalarth ID Scam) आहे.
 
या घोटाळ्यात मंत्रालयातील अनेक उच्च अधिकारीही सामील असल्याची तक्रार गाणार यांच्यापूर्वी माजी खासदार आणि विद्यमान विधानपरिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी केली होती. त्यावर आता गाणार यांनी थेट तपास यंत्रणेवर निषाणा साधत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. भाजपशी संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष आणि माजी आमदार नागो गाणार यांनी शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास करीत असलेल्या एसआयटीकडून जाणूनबुजून दिरंगाई करीत आहे, असे नमूद करीत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यात ते म्हणतात (Shalarth ID Scam) , त्यामुळे अनेक अधिकारी पळून जाऊ शकतात.
 
संस्थाचालकांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची आणि दोषी आढळल्यास जप्त करण्याची मागणी यापूर्वीही केली होती. मात्र, आतापर्यंत त्याची कसलीही दखल घेतली गेली नाही. शिक्षण विभागात नियुक्तीसाठी लाखोंच्या व्यवहारांच्या आणि नंतर उलटफेर करण्याच्या तक्रारी प्रलंबित आहेत. अनेक संस्थांच्या नावावर तक्रारी आहेत. जर एसआयटीने सखोल चौकशी केली तर कोट्यवधींचा घोटाळा उघड होऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली संस्थाचालकांची मनमानीही थांबवता (Shalarth ID Scam)  येईल.
 
2 मे 2012 नंतर सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी घातली तरी राज्यभरात अनेक नियुक्त्या झाल्या. तेव्हा पासून हा घोटाळा सुरू आहे. शाळा चालकांनी प्रत्येक नियुक्तीवर तरुणांकडून 30 ते 40 लाख रुपये आकारले. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी 3 ते 5 लाख रुपये देऊन शिक्षकांना मान्यता दिली. शालार्थ आयडीची प्रशासकीय प्रक्रिया घोटाळा थांबवण्यासाठी होती, परंतु, या मध्येही भ्रष्टाचार झाला. राज्यभरातील 59 शिक्षण अधिकाऱ्यांना दोषी ठरवल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालेली (Shalarth ID Scam)  नाही.
 
बहुतेक अधिकाऱ्यांना जामीन
 
गाणार यांनी यापूर्वीही हे प्रकरण उघड करीत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. हे प्रकरण फक्त नागपूरपुरते मर्यादित ठेवून एसआयटीची स्थापना झाली आहे. मात्र, घोटाळा व्याप्ती संपूर्ण राज्यात आहे. या प्रकरणात एकूण 9 अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते. यापैकी 6 अधिकाऱ्यांना जामीन मिळाला आहे. फक्त माजी विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार, चिंतामण वंजारी आणि मंगम तुरुंगात (Shalarth ID Scam) आहेत.
 
नागपूर मंडळ अधिकाऱ्याचेही नाव
 
या प्रकरणात नागपूर बोर्डात अलिकडेच अतिरिक्त जबाबदारी स्वीकारलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. परंतु काही अधिकारी अंतर्गत 'सेटिंग' करून अटक टाळत आहेत. प्रकरणाची तीव्रताही हळूहळू कमी होत आहे. अखेर मुख्य सूत्रधार कोण आहे, हे अद्याप उघड झालेले नाही.
 
वंजारी, जामदारांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी
 
प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींच्या नियमित जामीन अर्जांवर आता सत्र न्यायाधीश जोगळेकर यांच्या न्यायालयात 16 आणि 17 जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश जोगळेकर यांनी शुक्रवारी या जामीन अर्जांवरील निर्णयासाठी पुढील तारीख दिली आहे. या प्रकरणात माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक चिंतामण वंजारी, नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक वैशाली जामदार आणि माजी उपसंचालक प्रमोद मेंढे हे याचिकाकर्ते आहेत. प्रमोद मेंढे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (17 जून) तर चिंतामण वंजारी, वैशाली जामदार यांच्या जामीन अर्जांवर सोमवारी (16 जून) सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान, प्रमोद मेंढे यांच्या वतीने ॲड. उदय डबले यांनी बाजू मांडली, तर वंजारी, वाघमारे आणि जामदार यांच्या वतीने ॲड. कमल सतुजा आणि ॲड. अनमोल गोस्वामी यांनी युक्तिवाद केला.