लखनौ : ( Shocking Soap Case ) उत्तरप्रदेशातून एक अजब प्रकार समोर आला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अलीगड येथील रहिवासी असणाऱ्या एका 39 वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अटकेच्या कारणाने तुम्हाला धक्का बसेल, इतके आश्चर्यकारक कारण पुढे आले आहे. पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार केल्याने त्याला अटक झाली आहे. या व्यक्तीने पत्नीचा साबण वापरल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. यानंतर पोलिसांनी त्याची चांगलीच धुलाई केली आहे,असे आरोपी पतीने सांगितले आहे.
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, पती तिला खूप त्रास द्यायचा ( Shocking Soap Case ) . मारहाण करायचा, शिवीगाळही करायचा, त्यामुळे ती कंटाळली होती. आरोपीच्या बायकोच्या लक्षात आले की आरोपी पती प्रवीण कुमारने बायकोला न विचारता तिचा साबण वापरला तेव्हा तिला राग अनावर झाला. यामुळे त्यांच्यात वाद झाला. तो वाद इतका वाढला की पत्नीने थेट पोलिसांना बोलाविले. हा सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला आणि तक्रारही नोंदवली.
ठाण्यात झाली चांगलीच धुलाई
पत्नीच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी प्रवीण कुमारविरोधात गुन्हाही दाखल केला. एवढेच नाहीतर पोलिसांनी त्याला बेड्याही ठोकल्या आहेत. पोलिसांनी ठाण्यात नेऊन त्याची खूप धुलाई केली, असा दावा आरोपी प्रवीणने केला आहे.