_202506171404280883_H@@IGHT_500_W@@IDTH_950.png)
नागपूर : ( Bomb Threat On Flight ) कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मंगळवारी कोचीहून दिल्लीला येणाऱ्या या विमानाला नागपुरात लँड करण्यात आले . बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. जिथे सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढून तपासणी करण्यात आली.
या घटनेमुळे आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली असून विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, निर्धारित प्रोटोकॉलनुसार तात्काळ आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. ज्यामध्ये असे दिसून आले की धमकी गंभीर आहे. कारण, त्या धमकीत विमानाचा नंबर देखील स्पष्टपणे लिहिलेला होता. त्यावेळी विमानाने कोचीहून आधीच उड्डाण केले होते, जे सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सध्या प्रवाशांची ( Bomb Threat On Flight ) चौकशी सुरू आहे.