नैनिताल : ( Kedarnath Helicopter Crash ) गौरीकुंड हेलिकॉप्टर अपघात प्रकारणी नैनिताल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दात प्रश्न विचारले आहे. उच्च न्यायालयाने म्हणाले की, सतत अपघात का होत आहेत, त्यात काय कमतरता आहेत ? या समस्या का होतात याची राज्य सरकारने कसून चौकशी करावी, तसेच या प्रकरणी ठोस धोरण आखण्याची गरज भासते आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विमान कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळते, आणि त्यामुळे जीवितहानी होते.
मुख्य न्यायाधीश जी नरेंद्र आणि न्यायमूर्ती आलोक मेहरा यांच्या खंडपीठाने म्हणणे आहे की, हा उच्च हिमालयीन प्रदेश आहे. येथे हवामान सतत बदलत असते. त्यामुळे विमान कंपन्यांना डोंगराळ व मैदानी भागातील हवामान आणि धुक्याची माहिती असणे फारच गरजेचे आहे. पावसानंतर उच्च हिमालयीन प्रदेश साधारणपणे कोरडे राहतात. अशा परिस्थितीत सरकारने या प्रकरणी ठोस धोरण आखले पाहिजे. सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने न्यायालयाला माहिती दिली की, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चार धाम हेलिकॉप्टर सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. 15 जून रोजी सकाळी आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर केदारनाथ धामहून प्रवाशांना घेऊन गुप्त काशीला परतत होते. गौरीकुंडच्या वर पोहोचताच ते वरून सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या गौरी माई खार्कच्या ठिकाणी ( Kedarnath Helicopter Crash ) कोसळले.
मृतदेहांचे डीएनए
या अपघातात हेलिकॉप्टर मधील इंधनामुळे मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले आहेत. अशा परिस्थितीत कोणाचीही ओळख पटवणे कठीण आहे. सोमवारी मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात आली. अहवाल येताच ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले ( Kedarnath Helicopter Crash ) जातील.
आर्यन एव्हिएशनवर गुन्हा दाखल
उत्तराखंड सरकारने आर्यन एव्हिएशनचे जबाबदार व्यवस्थापक कौशिक पाठक आणि व्यवस्थापक विकास तोमर यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटले की, आर्यन एव्हिएशनला 15 जून रोजी हेलिकॉप्टर ऑपरेशनसाठी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंतचा पहिला स्लॉट मिळाला होता. परंतु, हा अपघात त्यापूर्वीच म्हणजे सकाळी 5:30 वाजता झाला. या संदर्भात, डीजीसीए आणि यूकेएडीएने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्यात ( Kedarnath Helicopter Crash ) आले आहे.