Teacher Transfers : एक हजार शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, पण कोण सावरणार केंद्रप्रमुखांची खुर्ची ?

Top Trending News    17-Jun-2025
Total Views |


teacher tra
 
 
नागपूर : ( Teacher Transfers ) जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यंदा एक हजार शिक्षकांच्या बदल्या होणार असून ही प्रक्रिया येत्या 23 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार याद्या ऑनलाइन तयार झाल्या आहेत. त्या 15 जूनला प्रसिद्ध होऊन त्यावर आक्षेप, हरकती आणि सुनावणी, अशी प्रक्रिया राबविली जाणार होती. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल. सत्र लागण्यापूर्वी अर्थात 23 जूनपूर्वी या बदल्या होईल, असा दावा प्रशासनाचा आहे. मध्यंतरी ऑनलाइन बदल्यांचे पोर्टल मंत्रालय स्तरावरून बंद होते. त्यामुळे या बदली प्रक्रियेला थोडा विलंब झाला आहे. या आठवड्यात बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

बदल्यांचे निकष

जिल्हा परिषद शिक्षकांच्या सेवेला एकाच ठिकाणी दहा वर्षांचा कालावधी झाला. त्यांना या बदलीसाठी पात्र ठरविल्या जाते. काही सवंर्गासाठी या सेवेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. जवळपास एक हजार शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाइन होत आहे. संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील पात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 1512 शाळा आहेत. साडेतीन हजारांवर शिक्षक कार्यरत ( Teacher Transfers ) आहेत.

केंद्रप्रमुख हे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील महत्त्वाचे पद आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून शासनाने विभागीय परीक्षा न घेतल्याने 68 पदे रिक्त आहे. या विषयी सुद्धा काहीतरी गडबड असल्याचा संशय सूत्रांकडून वर्तविला जात ( Teacher Transfers ) आहे.