गुजरातमधील ( Crash Site Gold ) अहमदाबादमध्ये १२ जूनला दुपारी एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग 737 कोसळले. या घटनेत देशाची प्रचंड मोठी हानी झाली. लंडनच्या दिशेने कुच केलेल्या विमानात केवळ अहमदाबादमधीलच प्रवासी नव्हते तर देशभरातील प्रवाश्यांचा सहभाग होता. या विमानात 242 प्रवासी होते. अहमदाबादमधील विमान अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियाला विमान अपघातात सहभागी असलेल्या वैमानिक आणि डिस्पॅचरचे प्रशिक्षण रेकॉर्ड आणि सहायक कागदपत्रे मागितली आहेत. तसेच, अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्राने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती 3 महिन्यांत आपला अहवाल सादर ( Crash Site Gold ) करेल.
या विमानाच्या अपघातस्थळी 80 तोळे (800 ग्रॅम) सोने, 80 हजार रुपये रोख, 1 मोबाईल फोन, भगवद्गीतेची प्रत, 9 पासपोर्ट आणि इतर वस्तू या हाती लागल्या आहेत. या घटने दरम्यान घटनास्थळी ढिगाऱ्यात एक मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप सापडला. तसेच दागिने, रोख रक्कम आणि पासपोर्टदेखील सापडले. या सर्व ऐवजाच काय केलं जाईल हा प्रश्न पडू शकतो. हे सर्व सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहे. 4-5 बॅग देखील देण्यात आल्या ( Crash Site Gold ) आहेत.
कुटुंबीयांना परत मिळतील अखेरच्या आठवणी
गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले होते की, घटनास्थळावर हाती लागलेल्या वस्तूंची कागदपत्रे तयार केली जात आहेत. त्यानंतर, मृतांचे सामान त्यांच्या कुटुंबीयांना परत केले जाईल. या घटनेत विमानातील 229 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट मृत्युमुखी पडले. विमानातील एक प्रवासी बचावला. वसतिगृहात उपस्थित 34 जणांनाही प्राण गमवावे लागले. त्यात काही स्थानिक लोकांचाही समावेश होता.