DGCA Inquiry : प्रशिक्षणावर संशय ? DGCA ची एअर इंडियाला नोटीस ! 120 तासांनंतरही नातलगांची हतबल प्रतिक्षा

Top Trending News    18-Jun-2025
Total Views |

air india cr
 
दिल्ली : ( DGCA Inquiry ) अहमदाबादमधील विमान अपघातानंतर डीजीसीएने (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) एअर इंडियाला विमान अपघातात सहभागी असलेल्या वैमानिक आणि डिस्पॅचरचे प्रशिक्षण रेकॉर्ड आणि सहायक कागदपत्रे मागितली आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्राने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती 3 महिन्यांत आपला अहवाल ( DGCA Inquiry ) सादर करेल.
 
डिस्पॅचर म्हणजे काय ?
 
उड्डाणाचे नियोजन करण्यास मदत करणारी व्यक्ती. डीजीसीए देखील या अपघाताची चौकशी करत आहे. डीजीसीएने सर्व फ्लाइंग स्कूल ला प्रशिक्षण नियमांचे पालन तपासण्यास सांगितले आहे. डीजीसीएने म्हटले आहे की, या विनंत्या अपघाताच्या 'नियामक' पुनरावलोकनाचा भाग होत्या. एअर इंडियाने डीजीसीएच्या आदेशाचे पालन केले आहे की नाही हे महत्वाचे.
 
केवळ 162 मृतदेहांची पटली ओळख
 
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटविल्यानांतर मृतदेह कुटुंबीयांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेत मृतदेह संपूर्ण जळून खाक झाल्याने ओळख पटविण्यासाठी डीएनए शिवाय पर्याय नाही. अपघाताच्या पाच दिवसांनंतर, 270 पैकी 162 मृतदेहांची डीएनए मॅचिंगद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. 120 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीचा ( DGCA Inquiry ) वापर केला जात आहे.

चौकशी समितीचा अहवाल 3 महिन्यांत
 
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ म्हणाले की, एअर इंडिया 34 बोईंग-787 ड्रीमलायनर विमाने चालवते, त्यापैकी 12 विमानांची सुरक्षा तपासणी करण्यात आली आहे. विमान अपघाताचे 'मूळ कारण' शोधण्यासाठी आणि यांत्रिक बिघाड, मानवी चूक आणि नियामक अनुपालन यासारख्या कोणत्याही घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आतापर्यंत कोणतीही समस्या आढळलेली नाही. विमानाच्या ब्लॅक बॉक्स डेटाच्या विश्लेषणातून अपघाताचे कारण कळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
नागरी विमान वाहतूक मंत्रालयानुसार केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखालील समिती संबंधित संस्थांकडून केल्या जाणाऱ्या इतर तपासांना पर्याय ठरणार नाही. तपासाच्या स्थितीबद्दल मोहोळ म्हणाले, तपास सुरू आहे आणि अनेक लहान तपशीलांची चौकशी केली जाईल. 'ब्लॅक बॉक्स' डाउनलोड केल्यानंतर अनेक गोष्टी समोर ( DGCA Inquiry ) येतील.
 
तिसऱ्या मजल्यावरून मारल्या उड्या
 
12 जूनला झालेल्या अहमदाबाद विमान अपघाताचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. एअर इंडियाचे विमान मेसच्या इमारतीवर कोसळले, याचा परिणाम मेसच्या आजूबाजूच्या वसतिगृहाच्या इमारतींवरही झाला. वसतिगृहाच्या अनेक इमारतींना आग लागली. व्हिडीओमध्ये दिसते आहे, ज्या इमारतीच्या बाल्कनीतून विद्यार्थी खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत त्या इमारतींना दोन्ही बाजूंनी आग लागली आहे. विद्यार्थी चौथ्या मजल्यावरून चादरीच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते ( DGCA Inquiry ) आहेत.

प्रियजनांना मृतदेहांची अद्यापही प्रतीक्षा
 
डीएनए चाचणीला 120 तास झाले आहेत तरीही कोणतेही उत्तर न मिळाल्याने अनेक कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. ते अस्वस्थ झाले आहेत. बऱ्याच जणांनी 12 जून रोजी अपघाताच्या दिवशी डीएनए चाचणीसाठी नमुने सादर केले होते. त्यांना 72 तास वाट पाहण्यास सांगण्यात आले, परंतु अद्याप मृतदेह मिळालेले नाही. त्यांच्यासाठी, ते अजूनही प्रतिक्षेतच आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या लक्षात घेता डीएनए नमुने जुळवण्यास वेळ लागू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे ( DGCA Inquiry ) आहे.
 
क्रू मेंबर रोशनी सोनघरे यांच्या नातेवाईक असलेल्या पूजा सुखदारे सांगतात, आम्ही काल डीएनए कलेक्शन सेंटरमध्ये गेलो होतो, पण, आमचे नमुने अद्याप जुळलेले नाहीत. घेतलेल्या 30 नमुन्यांपैकी आठ नमुने एकाच व्यक्तीचे होते. सुखदारे, सोनघरे यांचे वडील आणि भाऊ यांच्यासह, या दुर्घटनेपासून येथे आहेत. त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे राहते. क्रू मेंबर मैथिली पाटील यांच्या नातेवाईकांचीही अवस्था अशीच आहे. ते 12 जून रोजी नवी मुंबईतील न्हावा येथून येथे पोहोचले ( DGCA Inquiry ) होते.
 
विमान आहे कुटुंबाचे शत्रू
 
जामनगरमधील एका अनिवासी भारतीय जोडप्यासाठी आयुष्याने पुन्हा एकदा इतके क्रूर वळण घेतले. काही वर्षांपूर्वी विमान अपघातात त्यांनी आपला मुलगा गमावला. हा फक्त एक अपघात मानून या जोडप्याने आयुष्यात पुढे जाण्याचे धाडस दाखवले होते. आपलेपणाच्या शोधात ते काही दिवसांपूर्वी गुजरातच्या त्यांच्या मूळ भूमीवर परतले होते. परंतु 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय 171 क्रॅश झाल्याने सर्व काही उद्ध्वस्त झाले.
 
 कोण जबाबदार ? मुख्यमंत्री सिद्धरामय्या
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीसाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी निदर्शने केल्याबद्दल विरोधी भाजपावर टीका केली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीला आणि अहमदाबादमधील बोईंग विमान अपघाताला कोण जबाबदार आहे आणि त्यासाठी कोणी राजीनामा दिला हे सिद्धरामय्या यांना जाणून घ्यायचे होते.