District Politics : जिल्ह्यातील राजकारणात खळबळ! निवडणुकीच्या तोंडावर तापलं राजकीय वातावरण

Top Trending News    18-Jun-2025
Total Views |

poli
 
नागपूर : ( District Politics ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तपातांना दिसत आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना प्रक्रियेला सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असेही म्हटल्या जाते त्यामुळे त्याचे सर्वाधिकार मिळविण्यासाठी सर्व पक्षांनी कसून तयारी सुरू केली आहे. यासाठी निवडणूक आयोगही सज्ज झाला ( District Politics ) आहे.
 
जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेससह इतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली ( District Politics ) आहे.
 काँग्रेसकडून सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पदाधिकारी, सदस्य सक्रिय झाले असून, विचारमंथन शिबिरांद्वारे पक्षबांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उमरेड वगळता अन्य जागांवर यश न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये असलेली निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने मतदान घोटाळ्याचा आरोप केला असून, भाजपकडून त्याला कडक उत्तर दिले जात आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही अनिल देशमुख गटाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. तर ते नवीन कार्यकर्ते जोडण्यावर भर देण्याच्या योजना आखात आहे. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना भाजपच्या प्रलोभनांना बळी न पडण्याचा सल्ला दिला होता.
 
भाजपात इतर पक्षातील नेते प्रवेश करत असल्याने भाजपने ‘सर्वांचे स्वागत करा’ ही रणनीती स्वीकारली आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठामधील नाराज नेते, कार्यकर्ते आपल्या पक्षात ओढण्यास सुरुवात केली आहे. हा सर्व खाट्याटोप भाजप स्थानिक पातळीवरील विरोधकांना कमकुवत करण्यासाठी करीत आहे. त्यांना मुंबई व दिल्लीसह 'गल्ली'वरही सत्ता हवी असल्याचे चित्र आहे. महायुतीतील इतर घटक पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट देखील अशीच रणनीती राबवत आहेत.