Nuclear Superpower India : भारताची अण्वस्त्र ताकद जगाच्या रडारवर ! पाकिस्तानसाठी धोका वाढला ?

Top Trending News    18-Jun-2025
Total Views |

ne
 
जिनेव्हा : ( Nuclear Superpower India ) अहवालानुसार, जगात एकूण 12,241 अण्वस्त्रे होती, त्यापैकी 9,614 लष्करी साठ्यात होती. महत्वाची बाबा म्हणजे सुमारे 3,912 अण्वस्त्रे क्षेपणास्त्रे विमानांसह तैनात आहेत. 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तानसह जगातील जवळजवळ सर्व नऊ अण्वस्त्र संपन्न देशांनी त्यांचा अण्वस्त्रांचा साठा अपग्रेड करणे सुरू ठेवले आहे. त्यासोबत शस्त्रांचा साठाही वाढविला जात आहे. त्यामुळे, प्रत्येक देश स्वतःला अपग्रेड करण्यासाठी तत्पर आहे. ग्लोबल थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिपरी) एका अहवालात म्हटले की, भारताने 2024 मध्ये पुन्हा एकदा आपल्या अण्वस्त्रांचा साठा 'किंचित वाढवला' आहे. भारताने नवीन अण्वस्त्र प्रणालीला विकसित करणे सुरू ठेवले आहे. यामुळे शेजारील पाकिस्तानसाठी ती धोक्याची घंटा ठरू ( Nuclear Superpower India ) शकते.
 
सिपरीच्या अहवालानुसार, पाकिस्तानने 2004 पर्यंत अण्वस्त्रांच्या नवीन वितरण प्रणाली विकसित केल्या तसेच अण्वस्त्रांमध्ये वापरले जाणारे साहित्याचा साठा वाढवत ठेवला. येत्या दशकात पाकिस्तानने आपल्या अण्वस्त्रांचा साठा वाढवण्याची योजना आखली आहे. आकडेवारी समजते की, जगातील सुमारे 90 टक्के अण्वस्त्रे फक्त रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. अमेरिका आणि रशिया व्यतिरिक्त, यादीमध्ये ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायलचा समावेश ( Nuclear Superpower India ) आहे.

कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे ?
 
अमेरिका
 
अमेरिकेकडे एकूण 5177 अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी 1477 निवृत्त वॉरहेड आहेत. 3700 लष्करी साठ्यात आहेत. त्यापैकी 1770 तैनात आहेत आणि 1930 साठवलेले आहेत.
 
रशिया
 
रशियाकडे एकूण 5459 अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी 4309 लष्करी साठ्यात आहेत. येथे 1718 वॉरहेड तैनात आहेत आणि 2591 साठवलेले आहेत. रशियाने 1150 वॉरहेड निवृत्त केले आहेत.
 
ब्रिटन
 
ब्रिटनने 120 वॉरहेड तैनात केले आहेत आणि 105 साठवलेले आहेत. त्यांच्या लष्करी साठ्यात 225 शस्त्रे आहेत. ब्रिटनकडे एकूण 225 शस्त्रे आहेत.
 
फ्रान्स
 
फ्रान्सकडे एकूण 290 अण्वस्त्रे. त्यापैकी 280 तैनात आणि 10 साठ्यात
 
चीन
 
चीनकडे 600 अण्वस्त्रे. 24 तैनात आणि 576 साठ्यात
 
भारत
 
भारताकडे 180 अण्वस्त्रे आणि सर्व साठ्यात
 
पाकिस्तान
 
पाकिस्तानकडे 170, उत्तर कोरियाकडे 50 आणि इस्रायलकडे 90 अण्वस्त्रे आणि सर्व या देशांमध्ये लष्करी साठ्यात आहेत.
 
चीनमध्ये सर्वांत वेगाने वाढ
 
सिपरीचा अंदाजानुसार, चीनकडे किमान 600 अण्वस्त्रे आहेत. चीनने इतर कोणत्याही देशांपेक्षा आपला अण्वस्त्रांचा साठा अधिक वेगाने वाढवला आहे. निरीक्षकांच्या मते, चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांच्या साठ्याचा परिणाम भारतावरही होणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान देखील चीनच्या मित्रपक्षात येतो, आणि तो सुद्धा आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाला गती देत  ( Nuclear Superpower India ) आहे. सिपरीच्या अहवालावर प्रश्न विचारले असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, या अहवालावर चीनने कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.