सातारा : ( BJP Vs Congress ) स्वातंत्र्य मिळविण्यापासून देशाला प्रगतीच्या वाटेवर आणण्यापर्यंत काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात काम केले आहे. आता देश स्थिरस्थावर झाल्यानंतर फेक नॅरेटिव्ह आणि खोटे आरोप करून भाजप सत्तेवर आला आहे. सातारा जिल्ह्यात कऱ्हाड येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे समाजातून काँग्रेस कधीही संपणार नाही. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची आजही भाजपाला गरज भासत आहे. काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशामुळेच भाजपा मोठा पक्ष दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेसमुक्त देश करायला निघालेली भाजपा कधी काँग्रेसयुक्त झाली, हे त्यांच्या नेत्यांना सुद्धा कळले नाही.
भाजपालाही ( BJP Vs Congress ) आपली संघटना वाढविण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांचीच गरज भासत आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रवेश केल्यामुळेच भाजपा मोठा पक्ष दिसत आहे. पण, निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आजही काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. सत्तेच्या जीवावर मोठी झालेली भाजपा संघटना फार काळ टिकू शकणार नाही. कारण, जी ताकद काँग्रेस आणि तिच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, ती कधीही भाजपमध्ये निर्माण होऊ शकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
भाजपाकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही. सरकारकडून विकासाचे दाखविले जाणारे आकडे खोटे ( BJP Vs Congress ) असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. भाजपा हा काँग्रेसमुक्त भारत करायला निघाला होता. मात्र, विविध नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपाच काँग्रेसयुक्त झाली आहे. भाजपाकडे स्वत:चे कार्यकर्ते किंवा केडरबेस नाही. त्यामुळे देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाला आजही काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची गरज भासते आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.