अहमदाबाद - ( Black Box Mystery ) एअर इंडियाच्या एआय-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमानाचा 12 जून रोजी अहमदाबादमधील मेघानीनगर भीषण अपघात झाला. लंडनच्या गॅटविक विमानतळाच्या दिशेने निघालेल्या या विमानात 242 प्रवासी होते. या दुर्घटनेत एकूण 274 मृत्यू झाले आहेत. मात्र, अपघातात फक्त एकच प्रवासी बचावला. या दुर्घटनेनंतर आता तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'ब्लॅक बॉक्स' बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर 28 तासांनी ब्लॅक बॉक्स सापडला. सध्या यंत्रणेने प्राथमिक तपास सुरू केला असला तरी ब्लॅक बॉक्सला नुकसान झाल्यामुळे त्यातील डेटा बाहेर काढणे कठीण जात आहे. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) वॉशिंग्टन डीसी येथे पाठवला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. जर ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला गेला, तर भारतीय अधिकाऱ्यांची एक टीमही त्याच्यासोबत जाईल, जेणेकरून सर्व प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित ( Black Box Mystery ) करता येईल.
तपासात काय पाहिले जात आहे ?
- सीव्हीआरमार्फत पायलट्समधील शेवटचे संभाषण, चेतावण्या, अलार्म्स आणि इतर ध्वनी तपासले जातील.
- कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्यातील संवाद, त्यांच्या प्रतिक्रिया आणि अलार्मला दिलेले प्रतिसाद यांची नोंद असण्याची शक्यता आहे.
- एफडीआर वापरून फ्लाइटचा सविस्तर प्रवास, वेग, उंची, तांत्रिक प्रतिक्रिया आणि इतर डेटा सादर ( Black Box Mystery ) केला जाईल.
एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे पैसे चोरीला ?
पाटणा एअर इंडियाच्या विमानातील बक्सर ( Black Box Mystery ) येथील एका प्रवाशाने त्याच्या बॅगेतून 22,800 रुपये चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. पीडित नंदकुमार तिवारी यांनी पाटणा विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये एफआयआरसाठी अर्ज केला आहे. त्याने आरोप केला आहे की हे प्रकरण दाबण्याचा आणि गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिवारी म्हणाले की, तो 17 एप्रिल रोजी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पाटणाला गेला होता. त्याच्या बॅगेत 25,00 रुपये रोख आणि इतर वस्तू होत्या. पाटणा विमानतळावर उतरल्यानंतर आणि घरी पोहोचल्यानंतर त्याला आढळले की त्याच्या बॅगेत छेडछाड करण्यात आली आहे आणि त्यात फक्त दोन हजार रुपये शिल्लक आहेत. त्याच्या बॅगेतून 22,800 रुपये चोरीला गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच त्याचा मुलगा कुमार अभिज्ञान याने एअर इंडिया, पाटणा विमानतळ, दिल्ली एअर इंडिया टीम आणि एअर सेवा पोर्टलकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. एअर इंडियाने चोरीचा इन्कार केला ( Black Box Mystery ) आहे.
एअर इंडियाचे विमान माघारी
तर दुसरीकडे दिल्लीहून बालीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला राष्ट्रीय राजधानीत परतावे लागले. इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे एआय2145 ला तात्काळ दिल्लीला परतण्याचा सल्ला देण्यात ( Black Box Mystery ) आला. यापूर्वी, राष्ट्रीय राजधानीत खराब हवामानामुळे, बालीहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान (एआय2146) वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले. मंगळवारी वाराणसीत थांबल्यानंतर, त्याच रात्री विमान दिल्लीला रवाना झाले. पूर्व इंडोनेशियात शक्तिशाली ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे बुधवारी बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करावे लागले. अनेक उड्डाणांचा मार्गही बदलावा लागला, ज्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. खरं तर, पूर्व नुसा तेंगारा प्रांतात असलेल्या इंडोनेशियातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या माउंट लेवोटोबी लाकी लाकीचा मंगळवारी संध्याकाळी उद्रेक झाला. यामुळे 10,000 मीटर पेक्षा जास्त उंचीवर राखेचा मोठा ढीग आकाशात उडाला. ते सुमारे 150 किमी अंतरावरून दिसत होते.