Modi Targets Lalu : आंबेडकरांपेक्षा स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न, पंतप्रधान मोदींचा लालूंवर निशाणा

Top Trending News    20-Jun-2025
Total Views |

modi lalu 
 सिवान - ( Modi Targets Lalu ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारच्या सिवानमध्ये पाणी, रेल्वे व वीज संबंधित 6 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. सिवानमधील सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राजदवर बिहारला गरिबी व अराजकतेच्या दरीत ढकलल्याचा आरोप केला. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोचा अपमान केल्याबद्दल राजद अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्यावर टीका केली. त्यांनी बिहारमधून मोठ्या प्रमाणात कामगारांचे पलायनाचाही मुद्दा उपस्थित केला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी ( Modi Targets Lalu ) देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
 
गळ्यात निळा दुपट्टा घालून मोदींनी विरोधक प्रत्येक पावलावर बाबासाहेबांचा अपमान करत असल्याचा आरोप केला. लालूंच्या माफीची मागणी करणाऱ्यांना मोदी म्हणाले की, हे लोक कधीही माफी मागणार नाहीत. त्यांना दलित, महादलित, मागास आणि अत्यंत मागासलेल्या लोकांबद्दल आदर नाही. राज्यातील जनता दलितांच्या आदर्शाचा अपमान सहन ( Modi Targets Lalu ) करणार नाही.
 
 जंगलराज परत आणण्याचे षडयंत्र
 
पंतप्रधान म्हणाले की, बिहारच्या जनतेने काँग्रेस-राजदने निर्माण केलेले जंगलराज संपवले आहे. मात्र, आज जेव्हा बिहार वेगाने पुढे जात आहे, तेव्हा जंगलराज आणणारे पुन्हा संधी शोधत आहेत. ते पुन्हा त्यांच्या जुन्या कारनाम्यांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे आणि विकासाचा हा प्रवास थांबू देऊ नये. मोदींनी सांगितले की, ‘पंजा’ आणि ‘कंदील’ ने बिहारला स्थलांतराचे प्रतीक बनवले होते. परंतु नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने या आव्हानांवर मात करून बिहारला विकासाच्या ( Modi Targets Lalu ) मार्गावर आणले आहे.
 
 जग भारताच्या प्रगतीने प्रभावित
 
पंतप्रधान मोदी म्हणाले की या काळात मी जगातील मोठ्या देशांच्या नेत्यांशी बोललो आहे. भारताची जलद प्रगती पाहून ते सर्वजण खूप प्रभावित झाले आहेत. प्रत्येकाचा असा विश्वास आहे की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनणार आहे. या दिशेने बिहारची भूमिका ( Modi Targets Lalu ) खूप महत्त्वाची असणार आहे.
 
 राज्याचा सर्वांगिण विकास : नितीश
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भाषणात लालू-राबडी राजवटीची आठवण करून देत विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, 2005 मध्ये एनडीए सरकार सत्तेत येण्यापूर्वी लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. तो खूप वाईट काळ होता. आज महिला आत्मविश्वासाने बाहेर पडत आहेत, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व काम झाले आहे. आम्ही महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आणि आज त्यांचे सक्षमीकरण स्पष्टपणे दिसून येत आहे. नितीशकुमार यांनी जातीय जनगणना करण्याची घोषणा केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभारही मानले.
 
बिहारला नवी दिशा : चौधरी
 
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, नमामि गंगे योजनेअंतर्गत 6,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी सिवानला आल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. पंतप्रधान जेव्हा जेव्हा बिहारला येतात तेव्हा ते राज्यासाठी काही नवीन भेटवस्तू घेऊन येतात. संपूर्ण बिहार त्यांच्या आगमनाची वाट पाहत असतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याला नवी दिशा मिळत आहे यावर त्यांनी विशेष भर दिला.