तेहरान : ( Iran Vs US ) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी अमेरिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. या हल्ल्यावर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. परराष्ट्र मंत्री म्हणाले, तेहरानवरील अमेरिकेचा लष्करी हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे मोठे उल्लंघन आहे. याची संपूर्ण जबाबदारी वॉशिंग्टनच्या 'कायदेशीर प्रशासनाची' आहे. इराण आपल्या सार्वभौमत्वाचे आणि नागरिकांचे रक्षण करत राहील आणि हा संघर्ष एकतर्फी राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी इस्तंबूलमध्ये पत्रकारांशी बोलताना अराघची म्हणाले, इराणच्या अणुस्थळांवर हल्ला करून अमेरिकेने लाल रेषा ओलांडली आहे. त्यांनी केवळ आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर केला नाही तर संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे, इराण एनपीटी (अण्वस्त्र प्रसारबंदी करार) मधून माघार घेण्याचा विचार करू शकतो. जर एनपीटी इराणला कोणतीही सुरक्षा प्रदान करू शकत नसेल ( Iran Vs US ) तर आपण त्यावर विश्वास का ठेवावा ?, असेही ते म्हणाले.
तटस्थ देश
मेक्सिको : मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की मध्य पूर्वेतील सध्याचा संघर्ष केवळ संवादाद्वारेच सोडवता येईल. त्यांनी सर्व पक्षांना तणाव कमी करण्याचे आवाहन ( Iran Vs US ) केले.
न्यूझीलंड : न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हणाले की परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, हा संघर्ष आणखी वाढण्यापासून रोखणे महत्वाचे आहे. त्यांनी सर्व देशांना पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले.
या देशांचा अमेरिकेला पाठिंबा
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन सरकारचे म्हणणे आहे की इराणचा अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम जागतिक शांततेसाठी धोका आहे. परंतु, आम्ही अजूनही संवाद आणि राजनयिकता हा सर्वोत्तम मार्ग मानतो.
यूके : यूकेने अमेरिकेला पाठिंबा दिला आणि म्हटले आहे की जे काही केले आहे ते योग्य आहे आणि आम्हाला वाटते की इराणने चर्चेसाठी टेबलावर यावे.
युरोपियन युनियन : युरोपियन युनियनने अमेरिकेच्या हल्ल्याचे समर्थन केले आणि म्हटले आहे की इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असेल. इराणला असे करण्याची परवानगी ( Iran Vs US ) देऊ नये.
आखाती देशांमध्ये चिंता इजिप्तने इराणमधील तणाव वाढल्याचा निषेध केला, प्रदेशासाठी 'धोकादायक परिणामांचा' इशारा दिला. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर युएईने 'तात्काळ तणाव कमी करण्याचे' आवाहन केले. जर्मनीने इराणला अमेरिकेशी 'तात्काळ' चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले.