नागपूर : ( Wage Revenge ) आपल्या मालकाला बरबाद करण्याच्या नादात नोकराने एक धक्कादायक प्रकार केला आहे. सिदप्पाकडे एमएच-49/एटी-1845 आणि एमएच-49/0526 क्रमांकाचे दोन ट्रक आहेत. आकाश त्याच्याकडे चालक म्हणून कामाला होता. काही महिन्यांपूर्वी आकाशच्या निष्काळजीपणामुळे ट्रकला अपघात झाला होता. यात सिदप्पाचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून आकाश मालक सिदप्पाला पगाराचे 6 हजार रुपये मागत होता. मात्र सिदप्पा अपघातात झालेल्या नुकसानीचे कारण, पुढे करून त्याला शांत करीत होता. तसेच, त्याला नुकसान भरपाईची मागणी करीत होता. आकाशने सिदप्पाला त्याच्या पगारातून 2 हजार रुपये मागितले. सिदप्पाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आकाश नाराज झाला. तो थेट दारूच्या गुत्थ्यावर पोहोचला आणि दारू ढोसली. त्याच बॉटलमध्ये पेट्रोल भरून ग्रेट नाग रोडवरील ( Wage Revenge ) सिदप्पाच्या कार्यालयाजवळ आला.
मालक पगार देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संतापलेल्या चालकाने पेट्रोल ओतून त्याचे दोन ट्रक पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक दोन बंबांसह घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही ट्रकचे कॅबिन पूर्णत: जळून खाक झाले होते. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी मालक सिदप्पा इरय्या सोरलोट (37) रा. घाट रोडच्या तक्रारीवरून आरेापी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. आकाश टेकाम (30) रा. बेलतरोडी असे अटकेतील चालकाचे नाव आहे. संधी मिळताच त्याने कार्यालयाबाहेर रस्त्यालगत उभ्या दोन्ही ट्रकच्या कॅबिनमध्ये पेट्रोल ओतून आग लावली आणि फरार झाला. सिदप्पाने त्याला पळून जात असताना ( Wage Revenge ) पाहिले. या घटनेने परिसरात खळबळ मिळाली.
पाहता-पाहता लोकांची गर्दी जमली. ट्रकमध्ये आगीची माहिती तत्काळ पोलिस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली. इमामवाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच गंजीपेठ आणि कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातून दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दोन्ही ट्रकचे कॅबिन पूर्णत: जळाले होते. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर आकाशला ( Wage Revenge ) अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
ट्रक मालक सिदप्पाने सांगितले की, आकाश हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, शेवटी कंटाळून 10 दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून काढले. त्याने दुसऱ्या ठिकाणी कामही सुरू केले होते. त्याचे काही पैसे थकित होते. पैशांसाठी तो फोन करीत होता. मात्र जेव्हाही तो फोन करायचा नशेत असायचा. त्यामुळे, जेव्हा शुद्धीवर राहशील तेव्हा हिशेब करण्यासाठी येण्यास ( Wage Revenge ) सांगितले होते. मात्र त्याने त्यांचे दोन्ही ट्रक पेटवले.