नागपूर : ( Mini Golf Championship ) नागपूर शहराला क्रीडा क्षेत्रात एक विशेष ओळख मिळवून देणारी १० वी राष्ट्रीय वरिष्ठ गट मिनीगोल्फ अजिंक्यपद स्पर्धा २०२४-२५ यंदा नागपुरात आयोजित केली जात आहे. महाराष्ट्र मिनीगोल्फ असोसिएशन आणि नागपूर जिल्हा मिनीगोल्फ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी राष्ट्रीय वरिष्ठ गट मिनीगोल्फ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पुरुष आणि महिलांसाठी असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (ता.२७) रोजी सायंकाळी ६ वाजता वसंतराव नाईक शासकीय कला व सामाजिक विज्ञान संस्था येथे होणार आहे.
कार्यक्रमात उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ( Mini Golf Championship ) कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, कार्यक्रमाध्यक्ष मिनी गोल्फ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकर कोहळे, पॅराऑलिंपियन तथा छत्रपती पुरस्कार विजेता विजय मूनगेकर, विशेष अतिथी म्हणून मनपा आयुक्त तथा प्रशासक अभिजीत चौधरी, वसंतराव नाईक शासकीय कला व सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. मनोहर कुंभारे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, नागपूर विभागाचे क्रीडा आणि युवा सेवा संचालनालयाचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपाचे उपायुक्त विनोद जाधव, मिनी गोल्फ फेडरेशन एशियाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मानवटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक, शासकिय प्री- आय ए एस प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लांखे, पोलिस निरीक्षक विठ्ठल सिंह राजपूत, बुडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष कुमार मसराम, सामाजिक कार्यकर्ते श्री. अजय हिरणवार, सुनील मानेकर, जिल्हा परिषद सदस्य-बुलढाणा तथा अध्यक्ष-बुलढाणा जिल्हा मिनी गोल्फ संघटनेचे अध्यक्ष संजय वडतकर, नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण संस्थाचे प्राचार्य. डॉ. विवेक अवसरे यांच्या सह क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे क्रीडा समितीचे डॉ. सुरजसिंह येवतीकर, डॉ. अनिल बनकर, डॉ. बुद्धरत्न लिहितकर, डॉ. देविदास गाडेकर उपस्थित ( Mini Golf Championship ) राहतील.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा समितीचे प्रा. सुरेंद्र चव्हाण (सहसचिव-मिनी गोल्फ फेडेरेशन ऑफ इंडिया), श्रीराम धर्माधिकारी (अध्यक्ष रेफ्री बोर्ड), राजेश शेंडेकर (अध्यक्ष- तांत्रिक समिती, आशियाई मिनीगोल्फ स्पोर्ट्स फेडरेशन), डॉ. पियुष अंबुलकर (छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व क्रीडा अधिकारी, म.न.पा. नागपूर), डॉ. विवेक शाहू, डॉ. चेतन महाडिक, केतन ठाकरे, निखिल मोहिते, निखिल वैकुंठ, किशन चौधरी, पवन हिवरकर, विनोद सुरदुसे, डॉ. सुयश पांडगळे यांच्या खांद्यावर आहे. या राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून नागपूरला मिनी गोल्फच्या राष्ट्रीय नकाशावर अधोरेखित करणे व नवोदित खेळाडूंना व्यासपीठ ( Mini Golf Championship ) उपलब्ध करून देणे हे स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे.