Trump Diploma Fail : ट्रम्पचा सीझफायर झाला फेल ! इराण-इस्रायलमध्ये अजूनही रणधुमाळी

Top Trending News    25-Jun-2025
Total Views |

ttrump
 
दिल्ली : ( Trump Diploma Fail )  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच यांनी भारतीय वेळेनुसार रविवारी इराणच्या अणु तळांवर बंकर बस्टर 'महाबॉम्ब' टाकला. यावर, प्रत्युत्तर म्हणून इराण सोमवारी रात्री मध्यपूर्वेतील कतार, इराक, कुवेत, बहरीन येथील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करतो. या हल्ल्यानंतर, त्यांनी रात्री उशिरा इस्रायल-इराणमध्ये युद्ध बंदीची घोषणा केली जाते. इराण-इस्रायल घोषणा 'फेटाळून' एकमेकांवर जोरदार हल्ले करत राहतात. मंगळवारी सकाळपर्यंत एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यासह अनेक आरोप आणि प्रत्यारोपांनंतर दोन्ही देशांनी त्यांच्या स्वतःच्या अटींवर युद्धबंदी (सीझफायर) करण्यास सहमती दाखवली. परिस्थिती अशी आहे की एकमेकांवर हल्ले नेहमीप्रमाणे सुरूच आहेत तरीह दोन्ही देश ( Trump Diploma Fail ) ते केल्याचे नाकारत आहेत.
 
ट्रम्पच्या युद्धबंदी घोषणेच्या काही तासांतच इस्रायलने मंगळवारी दावा केला की इराणने त्यांच्या देशावर पुन्हा हल्ला ( Trump Diploma Fail ) केला आहे. मंगळवारी सकाळी इस्रायलवर इस्रायलने 6 वेळा क्षेपणास्त्र डागले. बेअरशेबा शहरातील एका इमारतीवर एक क्षेपणास्त्र पडले, ज्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यावर इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनीही इस्रायलविरुद्ध प्रत्युत्तर देण्याचे आदेश सैन्याला दिले आहेत. काट्झ यांनी तेहरानवर जोरदार हल्ला करण्यास लष्कराला सांगितले आहे.
 
ट्रम्पच्या आदेशानंतर सुद्धा इराण आणि इस्रायलने युद्धबंदी करण्यास नकार दिला. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी युद्धबंदीचा निर्णय नाकारला असून अद्याप कोणताही अंतिम युद्धबंदी करार झालेला नाही. जर इस्रायलने हल्ले थांबवले तर इराणही हल्ला थांबवेल. इस्रायलकडूनही जवळजवळ अशीच प्रतिक्रिया आली. एका सरकारी टेलिव्हिजनद्वारे मंगळवारी इस्रायली हल्ल्यात इराणी अणुशास्त्रज्ञ मोहम्मद रझा यांचा मृत्यू झाल्याची बाबा पुढे येते आहे. ते उत्तर इराणमधील अस्तानेह-ये अश्रफियेह येथे त्यांच्या पालकांच्या घरी गेले होते. या काळात इस्रायलने आकाशातून क्षेपणास्त्रे डागली आणि मोहम्मद रझा यांना जीव गमवावा ( Trump Diploma Fail ) लागला.
 
इस्रायलला इशारा
 
इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करून हल्ला थांबवण्यास सांगितले. त्यांनी इराणवरील कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याविरुद्ध इशारा दिला आणि असे म्हटले की अशा कृतीमुळे युद्धबंदीचे उल्लंघन होईल. ते म्हणाले की ते इराणवर खूश नाहीत, परंतु ते इस्रायलवर नाराज आहेत. ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवर बॉम्ब टाकू नयेत तसेच वैमानिकांना घरी परत बोलवावे असे सांगितले. अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईट हॅमरमध्ये सहभागी असलेल्या बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. मिसूरीजवळील व्हाईटमन एअर फोर्स बेसवरून उड्डाण करताना इराणच्या अणु सुविधांवर हल्ला झाल्याचे दिसून येते. मुख्य स्ट्राइक पॅकेजच्या 7 स्टेल्थ बॉम्बर्सनी न थांबता उड्डाण ( Trump Diploma Fail ) केले आणि बॉम्ब टाकून घरी परतले. हे ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी एकूण 37 तास लागले, ज्यामध्ये टेकऑफपासून परत येईपर्यंतचा वेळ समाविष्ट आहे.