Mahal Violence Twist : झाडं तोडतोय की दंगल घडवतोय ? महाल दंगल प्रकरणी सद्दाम हुसेनला जामीन

Top Trending News    03-Jun-2025
Total Views |

court
 
नागपूर : ( Mahal Violence Twist ) अलिकडेच महाल दंगल प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात २०० जणांना आरोपी बनवण्यात आले असले तरी, फक्त ८ किंवा ९ जणांना अटक करण्यात आल्याचे निरिक्षण नोंदवले होते. अशात आता दंगलीच्या वेळी दुभाजकांदरम्यान झाडे तोडणा-या एकाला आरोपी बनविण्यात आल्याचे समोर आले असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
हसनबाग रहिवासी आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे सद्दाम हुसेन अब्दुल लतीफ अन्सारी यांनी या प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल ( Mahal Violence Twist ) केला होता. सुनावणीनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. पवार यांनी त्यांना कठोर अटींसह जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. न्यायालयाने आदेशात नमूद केले की, अर्जदाराने सदर गुन्ह्यात कोणत्याही थेट कृत्यात भाग घेतलेला नाही. ज्यामुळे दंगलीसाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही. ते फक्त त्यावेळी रस्त्यावरील दुभाजकावर लावलेली झाडे तोडत होते. अशा परिस्थितीत, योग्य जामीन आदेश देता येतील.
 
धार्मिक वादासाठी प्रक्षोभक भाषण
 
अभ्यास पक्षाच्या म्हणण्यानुसार, १७ मार्च २०२५ रोजी गणेशपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गांधी गेट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली आणि औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात ( Mahal Violence Twist ) आला. त्याच दिवशी सकाळी ११.०० वाजता अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे शहराध्यक्ष फहीम खान सलीम खान आणि ५० ते ६० लोक बेकायदेशीरपणे जमले आणि त्यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात लेखी निवेदन दिले. त्यानंतर ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे सदस्य आणि त्यांच्यासोबत जमलेल्या जमावाला शांतता राखण्याचे निर्देश देण्यात आले. तथापि, जमावाने दुपारी ४ वाजताच्या सुमारास वरील घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील लोकांना चिथावले आणि दोन समुदायात धार्मिक वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक भाषणे दिलेत.
 
खोट्या गुन्ह्यात अडकवले
 
सुनावणीदरम्यान, सद्दामच्या वकिलांनी सांगितले, त्या दिवशी ( Mahal Violence Twist ) आरोपी नियमित व्यवसायात व्यस्त होता. कपडे आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात आला होता. त्याने सदर गुन्ह्यात भाग घेतला नव्हता आणि हे त्याच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. तो घटनास्थळी उपस्थित नव्हता किंवा तो कोणत्याही हिंसाचार, जाळपोळ आणि बेकायदेशीर कृत्यातही सहभागी नव्हता. जातीय तणाव आणि राजकीय हेतूंमुळे तथ्यांची योग्य पडताळणी न करता अर्जदाराला सदर गुन्ह्यात खोटे गोवण्यात येत आहे.
 
औरंगजेबच्या कबरीवरून पेटली दंगल
 
आंदोलनानंतर दोन धार्मिक गटांत संघर्ष पेटल्यामुळे महाल मधील झेंडा चौकात तणाव ( Mahal Violence Twist ) निर्माण झाला. दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली. जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनाही अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. काही जण ठिकठिकाणी अडकून पडले. तर काही जण जीव मुठीत घेवून घराकडे निघाले. दरम्यान पोलिस अधिकारी, अंमलदार जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत तणावाची स्थिती असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. परिसरात कलम 163 लागू करण्यात आले होते.
 
नागपुरातही विहिंप आणि बजरंग दलाकडून महालच्या गांधी गेटवर शिवाजी पुतळ्यासमोर औरंगजेबाची कबर हटविण्यावरून आंदोलन ( Mahal Violence Twist ) करण्यात आले होते. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्यासमोर औरंगजेबाचा पुतळा ठेवला. पोस्टरसोबतच पुतळ्यावर धार्मिक चादर ठेवली. त्यावर गुलाल टाकून पुतळा जाळण्यात आला होता. बजरंग दलाच्या या कृत्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि पाहता-पाहता तणावाची स्थिती निर्माण झाली. दुपारच्या नमाजनंतर मोठ्या संख्येत एका गटाचे लोक चौकात जमा झाले होते. बजरंग दलाने जाणिवपूर्वक धार्मिक भावना दुखावल्या आणि विचारपूर्वक कट-कारस्थान रचल्याचा आरोप लावण्यात ( Mahal Violence Twist ) आला होता. परिसरात संतप्त जमावाची संख्या वाढतच गेली आणि परिस्थिती चिघळली.
 
हिंसाचारादरम्यान पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मात्र कुऱ्हाडीचा वार त्यांनी हाताने अडविला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर गस्त सुरू करण्यात आली. अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवली गेली. पोलिसांकडून परिसरातील डम्प डाटाही काढण्यात आला.  
 
 महालमध्ये सोमवारी घडलेल्या दंगलीसाठी जबाबदार संशयितांची गणेश पेठ पोलिसांनी धरपकड सुरू केली होती तर बुधवारी रात्रीपर्यंत 69 संशयितांना अटक केली आहे. त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मंगळवारी यातील 27 संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत सुनावणी सुरू होती, या दरम्यान फिर्यादी पक्षाने आरोपींचे जबाब नोंदवले.