Mahesh Navami : उद्या महेश नवमी ! जाणून घ्या शिवकृपेने जन्मलेलं एक दिव्य कुळ

Top Trending News    03-Jun-2025
Total Views |

m
 
महेश नवमीला ( Mahesh Navami ) भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते. भगवान शिवाचे सर्व भक्त या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करतात. भगवान शंकराच्या या नावावरूनच माहेश्वरी समाज हे नाव मिळाले आहे. महेश्वरी समाजात महेश नवमीला खूप महत्त्व आहे. यावर्षी महेश नवमीचा सण कधी साजरा केला जाईल आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कधी असेल याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
 
माहेश्वरी कुळाची निर्मिती
 
एका मान्यतेनुसार, महेश नवमीच्या दिवशी भगवान महेश आणि माता पार्वतीने ऋषीमुनींच्या शापामुळे दगड बनलेल्या 72 क्षत्रियांची मुक्तता केली. यानंतर माता पार्वतीने त्या क्षत्रियांना आशीर्वाद दिला की, तुमच्या कुळावर आमची कायम छाप राहील. आणि महत्वाचे म्हणजे तुमचे कुळ माहेश्वरी या नावाने ओळखले जाईल. त्यामुळे महेश्वरी समाजात महेश नवमीच्या ( Mahesh Navami ) दिवशी भगवान शंकराच्या पूजेला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराच्या महेश स्वरूपाची पूजा केल्याने दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळते.

पूजा मुहूर्त
 
महेश नवमी ( Mahesh Navami ) हा पवित्र सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. बुधवार, 4 जून 2025 रोजी महेश नवमी साजरी केली जाईल. शुभ मुहूर्तावर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे खूपच फायदे देणारे ठरते.
 
नवमी तिथीची सुरुवात : 3 जून 2025 रोजी रात्री 09:56 वाजता
नवमी तिथी समाप्त : 4 जून 2025 रोजी रात्री 11:54
 
पूजेची पद्धत
 
महेश नवमीच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सकाळी स्नान करून ध्यानाला बसावे. यानंतर भगवान शंकराला चंदन, फुले, गंगाजल इत्यादी अर्पण करून पूजा सुरू करावी. पूजेदरम्यान तुम्ही शिव चालिसाचे पठण करू शकता. यासोबतच शिव मंत्रांचा जप केल्याने लाभ मिळतात. पूजेच्या शेवटी भगवान शंकराची आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी फक्त फलाहार घ्यावा. महेश नवमीच्या दिवशी दान केल्याने तुम्हाला त्याचे भरभरून आशीर्वाद मिळतात.