नागपूर : ( Blame On Modi ) 'देश दहशतवाद्यांच्या हल्ल्याने सातत्याने रक्तबंबाळ होत आहे. दुसरीकडे एकही राष्ट्र भारताच्या बाजूने उभे नाही. परराष्ट्र धोरण, कुटनिती डावपेच फेल पडल्यानंतर पहलगामच्या निमित्ताने पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची संधीही गमावली. जिंकलेले युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींमुळे आपण हरलो. 'विश्वगुरू जग पालथा घालत आहेत. परंतु, एकाही राष्ट्राला आपल्या बाजूने उभे करू शकले नाहीत. रशिया, फ्रान्स कुठेच सोबत नव्हते. चीनने पाकिस्तानला शस्त्र पुरविली. अमेरीकेने तर पाकिस्तानला अक्षरक्ष: कवटाळले, अशी खंतही वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ट्रम्पने युध्दबंदी घोषित करावी एवढी पत विश्वगुरूमुळे भारताची जगात घसरली' या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशापयशावर पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठविली आहे. संघाची कुबडी घेऊन राजकारण करणाऱ्याला ट्रम्पची दादागिरी मोडता आली नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आजही युध्द संपल्याचे मोदींनी जाहीर केले नाही. त्यामुळे आपण इराणचे खोमेनी यांच्यासारखी भूमिका घेणार की पुन्हा ट्रम्पला शरण जाणार, असा सवालही त्यांनी उपस्थित ( Blame On Modi ) केला.
अॅड. आंबेडकर म्हणाले,'ऑपरेशन सिंदूर ही लुटपुटूची लढाई आहे. या युध्दात भारत सपशेल हरला आहे. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे. हल्ला दहशतवादी केंद्रातून नव्हे पाकिस्तानातून होत असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुरू आहे. देश रक्तबंबाळ होत आहे. तरीही, सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. पाकिस्तानचे 5 तुकडे वा नेस्तनाबुत करण्याची ( Blame On Modi ) मोठी संधी देशाने गमावली.
संघाचे बोधचिन्ह स्वास्तिक आहे. ते हिटलरला मानतात. युद्ध सुरू होते. पुढील काही दिवसात भारत जिंकणार होता. तेव्हा अचानक अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दबंदीची घोषणा केली. तेव्हा सैनिकही पंतप्रधानांना अश्लील शिव्या देत भडकल्याचा किस्सा आंबेडकर यांनी सांगितला. कॅन्टोन्मेंटमध्ये राहणारा सैनिक अंतीम युध्दाऐवजी 30 वर्षांपासून रस्त्यांवर व सीमेवर उभा आहे, ही लाजीरवाणी बाब असल्याचे ( Blame On Modi ) आंबेडकर म्हणाले.
'ऑपरेशन सिंदूर आणि नंतरच्या घडामोडी' या विषयावर फुले आंबेडकर इंटेलेक्च्युअल फोरमतर्फे परवाना भवन येथे व्याख्यानाचे आयोजन केले होते. अॅड. आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरची पोलखोल केली तर भारताची जगात झालेली नाचक्की, पाकिस्तानची कायमची जिरविण्याची संधी, विरोधकांची भूमिका तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील मौनीबाबांवरही बोचरी टीका केली आहे.