नागपूर : ( Emotional Court Decision ) माहेरची साडी या चित्रपटातील 'सासरला हि बहिण निघाली', या गाण्याच्या ओळींप्रमाणेच एक हृदयस्पर्शी घटना नागपुरात घडली आहे. बहिणीच्या लग्नात उपस्थित राहता यावे यासाठी कारागृहात बंद असलेल्या भावाला उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून, टिकेश उर्फ गोलू शिवदयाल शाहू असे आरोपीचे नाव आहे.
टिकेश शाहू याच्यावर बुटीबोरी पोलीस ठाण्यात हत्येच्या आरोपाखाली (भादंवि कलम 302, 307) गुन्हा दाखल असून तो मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्या एकुलत्या बहिणीचे लग्न आज, बुधवारी 4 जून रोजी सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. बहिणीच्या हट्टापायी आणि एकुलता एक भाऊ असल्याने लग्नात उपस्थित राहण्याची तिची तीव्र इच्छा ( Emotional Court Decision ) होती. यामुळे गोलूने कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन उच्च न्यायालयात 3 जून ते 6 जूनपर्यंत तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला.
सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी हा एकुलता एक भाऊ असून, त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्याला दोन दिवसांसाठी जामीन दिला जाऊ शकतो. सरकारी वकिलांना कोणताही आक्षेप नसल्याने आणि एकुलत्या बहिणीचा विवाह सोहळा असल्याने उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन ( Emotional Court Decision ) मंजूर केला.
न्यायालयाचा निर्णय आणि अटी
न्यायालयाने आरोपीला 4 जूनच्या सकाळी 11 वाजल्यापासून 5 जूनच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत तात्पुरता जामीन दिला आहे. जामिनावर असताना आरोपीला पोलिसांच्या संरक्षणात राहावे लागेल आणि यासाठी नियमानुसार पैसे जमा करावे लागतील. जामिनाचा कालावधी संपल्यावर गुरुवार, 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरोपीला कारागृहात हजर व्हायचे आहे, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. आरोपीच्या वतीने अॅड. एस. डी. चांदे यांनी, तर शासनाच्या वतीने अॅड. एन. एस. कौटकर यांनी बाजू मांडली.
बहिणीची इच्छा पूर्ण
मोठा भाऊ म्हणून लग्नात त्याची उपस्थिती तिला हवी होती. तिने आई-वडिलांकडे भावाला भेटण्याचा हट्ट केला होता. गोलूने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्याने आणि न्यायालयाने दोन दिवसांचा जामीन मंजूर ( Emotional Court Decision ) केल्याने अखेर बहिणीची ही इच्छा पूर्ण झाली आहे.