Jain Temple Mystery Thief : 'तो' चोर फक्त जैन मंदिरातच का करत होता चोरी ? नागपूर पोलिसही थक्क

Top Trending News    04-Jun-2025
Total Views |

jain
 
नागपूर : ( Jain Temple Mystery Thief ) जुनी शुक्रवारी रोडवरील ग्रेट नाग रोड येथील शीतलनाथ दिगंबर जैन मंदिराच्या सचिवांनी चोरीची तक्रार केली. 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6.50 वाजता नागपूरच्या जुनी शुक्रवारी रोडवरील ग्रेट नाग रोड येथील शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरात झालेल्या चोरीची माहिती मुकेश दोशी यांनी फोनवरून दिली होती. मंदिरातील काही दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्या आधारे सचिवांनी तक्रार नोंदवली. तपास अधिका-यांनी आरोपीला अटकही केली.
 
त्यानंतर कोलवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अंतर्यामी उर्फ संतोष परमानंद दासला अटक केली. त्यानंतर त्याच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सुनावणीदरम्यान अंतर्यामीच्या वतीने बाजू मांडणा-या वकिलाने सांगितले की, या पूर्वी कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता, परंतु आता आरोपपत्र दाखल झाले असून, तपास पूर्ण झाला आहे. अर्जदाराला या प्रकरणात खोट अडकविण्यात आल असून, त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून असल्याचे आरोपीचा जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. अर्जावरील सुनावणी दरम्यान या आरोपीने भारताच्या अनेक राज्यांतील मंदिरांमध्ये चो-या केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने ( Jain Temple Mystery Thief ) अंतर्यामीचा जामीन नाकारला.
 
जैन मंदिरांमध्ये चोरी करण्याची सवय
 
न्यायालयाला सांगण्यात आले की, गणेशपेठ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. जामिनावर सुटल्यानंतर अर्जदाराला पुन्हा चोरी करण्याची सवय आहे. आपली ओळख लपवण्यासाठी अंतर्यामीने बनावट आधार कार्ड बनवले असून, त्याने गोंदियाच्या रामदेवरा मंदिरातही ( Jain Temple Mystery Thief ) चोरी केली आहे. त्याच्या विरुद्ध एक गुन्हा रायगड पोलिसांत तर हा गुन्हा लालबाग कटक पोलिसांतही दाखल आहे. अमरावतीच्या कोल्हापुरी गेट पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
 
जामिनाला कडाडून विरोध करत सरकारी वकिलांनी सांगितले की, अर्जदाराला देशभरातील जैन मंदिरांमध्ये चोरी करण्याची सवय आहे. अर्जदाराने भगवान शीतलनाथ, भगवान शांतीनाथ आणि इतर भगवानांच्या चांदीच्या मूर्ती चोरल्या असून भगवानांचे चांदीचे सिंहासन आणि दानपेटीत ठेवलेली रोख रक्कमही लंपास केली आहे.
 
अशा प्रकारे त्याने 11 लाख 82 हजार 500 रुपयांच्या वस्तू चोरल्या आहेत. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे. तहसील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तो सुनावणीला हजर राहिला नाही. त्याचप्रमाणे, गोव्याच्या पणजी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातही तो फरार आहे. याशिवाय, कर्नाटकच्या मुदाबिद्री पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातही ( Jain Temple Mystery Thief ) अर्जदार फरार आहे.