Ajit Pawar : जपानी कंपन्यांना ओपन गेट ! गुंतवणूक की राजकीय खेळी ?

Top Trending News    05-Jun-2025
Total Views |

ajit1
 
मुंबई : ( Ajit Pawar ) जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांची भेट घेतली. या भेटीत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली त्यात जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्याविषयी चर्चा झाली. भारत आणि जपान हे नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही एक वेगळे नाते आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका विशेष महत्वाची राहिली आहे. भारतात जपानने मोठी औद्योगिक गुंतवणुक केली आहे. यात महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत ( Ajit Pawar ) आहेत.
 
प्रगती की स्पर्धा ?
 
परदेशी कंपन्यांमुळे नवनवीन तंत्रज्ञान तर येईल, पण यामुळे स्थानिकांच्या उद्योगावर विपरीत परिणाम होईल का ? याचाही विचार करणे आवश्यक आहे. इथे विकासाच्या नावाखाली औधोगिक क्षेत्राचं राजकारण तर होत नाही ना ! उद्योगाच राजकारण झालं तर भारतीय युवा शक्तीला त्याची किंमत मोजावी लागेल. आधीच असलेल्या स्पर्धेत आता जपनीज कंपन्यांची स्पर्धा वाढविणे कितपत योग्य आहे, यावर प्रशचिन्ह उभं आहेच. त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधा या आपल्या उद्योगांवर विपरीत परिणाम करणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
जपानशी सहकार्य वाढविणार
 
राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य या कंपन्यांकडून होत आहे. तर या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करून उद्योगपुरक वातावरण निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. तसेच, पुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुया, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांना सांगितले. उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरच दोन्ही सामाजिक,सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही या चर्चेत विशेष भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
 
मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांचा प्रश्नांना सोडविण्यास प्रयत्न राज्य शासन करणार आहे. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण इ. पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती शासनाद्वारे पार पाडण्यात येईल.पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी दळणवळणासंदर्भातील सर्व प्रश्न सुद्धा तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक होईल, यात धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातील, अशी चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांची जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांशी झाली.