Narendra Ka Surrender : ‘मुकद्दर का सिकंदर’ ते ‘नरेंद्र का सरेंडर’ ! मोदींच्या भूमिकेतील धक्कादायक बदल

Top Trending News    05-Jun-2025
Total Views |

surrendar 
दिल्ली : ( Narendra Ka Surrender ) भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार त्याचे श्रेय स्वतः घेतले. यावरून आता भारतीय राजकारणात खळबळ उडाली असून त्याचे वेगवेगळे अर्थ काढून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर तीव्र हल्ला चढवून त्यांच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
 
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले ( Narendra Ka Surrender ) आहे. ते म्हणले गेल्या 11 वर्षांपासून भाजपा ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट बनवत होती, पण चित्रपट तयार झाला त्याचे नाव बदलले आणि ‘नरेंद्र का सरेंडर’ असे झाले आहे. शौर्य हे कोणत्याही इंजेक्शनने येत नाही, ते चारित्र्याने येते. भाजप-आरएसएसचा इतिहास भ्याडपणाचा आहे.
 
पवन खेडा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या विधानावरही निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध त्यांच्यामुळेच थांबले आहे. तसेच खेडा म्हणाले, ट्रम्पचा फोन मोदींना आला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. 22 दिवसांत ट्रम्प यांनी डझनभर वेळा युद्धबंदी पूर्ण केल्याचे म्हटले आहे. यावर पंतप्रधानांनी एकदाही त्यावर उत्तर दिले नाही. त्यांचे नाव फक्त नरेंद्र आणि ते काम समर्पणाचे करतात, अशी खेडा यांनी मोदींवर सडकून टीका ( Narendra Ka Surrender ) केली.
 
काँग्रेस प्रवक्त्यांनी चीनच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधान मोदींना सुनावले आहे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी चीनला घाबरतात. बांगलादेश सीमेजवळ चीनने एअरबेस बांधल्याबद्दल सरकारच्या मौनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, तुम्ही खरोखरच धाडसी असाल तर चीनचा सामना करण्यासाठी धोरण बनवा, फक्त संवादाने संवाद खेळून काहीही साध्य होणार नाही. ते पुढे म्हणाले, मोदींनी संवाद सादरीकरणाचे प्रशिक्षण परेश रावल यांच्याकडून घेतले असावे, ज्यांना त्यांनी एकेकाळी खासदार बनवले होते, एस जयशंकर यांच्याबद्दल, खेडा म्हणाले की, ते आता पराजय शंकर झाले आहेत. ते म्हणाले की जयशंकर गप्प आहेत, कारण जेव्हा जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांना ट्रोल केले जाते.