नागपूर : ( Teacher Training ) राज्यातील प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन आणि निवड श्रेणी देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु, हे प्रशिक्षणात म्हणजे ऑनलाईन मूल्यांकन आता नवी डोकेदुखी झाली आहे. प्रशिक्षणात हे संकेतस्थळ वारंवार हॅक होत आहे. ती लिंक उघडत नसल्यामुळे ऑनलाईन मूल्यांकनाच्या नावाखाली शिक्षकांचा मानसिक छळ करण्याचा प्रकार सुरु आहे. हे प्रशिक्षण 12 वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी तर, 24 वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी देण्यासाठी परिषदेने 12 जूनपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन ( Teacher Training ) केले आहे.
अविश्वासाची प्रचिती
या प्रशिक्षणात ( Teacher Training ) प्रत्येक तासानंतर उपस्थिती आणि ऑनलाइन मूल्यांकन अनिवार्य असल्यामुळे या सर्व्हर या अधिकच त्रास होत आहे. या ऑनलाईन मूल्यांकनासाठी प्रत्येक तासानंतर सर्व्हर डाऊन होते. त्यामुळे लिंक उघडत नाही. या तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या 2 दिवसात शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दर तासाला ऑनलाईन उपस्थिती सोबतच परीक्षा घेतल्याने प्रशिक्षण स्थळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण होत आहे.
शिक्षकांची गैरसोय
गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर झालेले नाही. जिल्हा परिषदेसारखे काही अपवाद वगळता, राज्यभरातील शिक्षकांसाठी निवड श्रेणी मिळणे हे एक दिवास्वप्न बनले आहे. कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तरीसुद्धा या प्रशिक्षणासाठी ( Teacher Training ) प्रत्येक शिक्षकाकडून 2 हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांची गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी साधी चहा किंवा नाश्त्याचीही व्यवस्था नाही. वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत प्रशासन इतके उदासीन का आहे ? हा चर्चेचा विषय आहे.
नाराजीचा सूर
शिक्षण विभागात शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यामुळे आधीच अधिकाऱ्यांच्या डोक्यावर टेन्शन आहे. अधिकारी कोणतेही मोठा निर्णय घेण्यास धजावत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच शिक्षण प्रशिक्षणाचे सर्व्हर आता डोक्याला ताप झाले आहे. त्यामुळे, मोठ्या अडचणींचा सामना शिक्षण विभागाला करावा लागल आहे. शिक्षकांना देखील सर्व्हर मुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षण विभागाचे हे प्रशिक्षण तब्बल 25 वर्षांनंतर एकदा होते, असे देखील एका शिक्षकाने सांगितले. काही शिक्षकांची नवे सर्व्हरमुळे जाच झाल्याचे बघायला मिळाले. दूरवरून प्रवास करत आलेल्या शिक्षकांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रशिक्षणाचा लाभ घेता आला नाही परिणामी त्यांना घरी परतावे लागले.