Jyestha Month Secrets : ज्येष्ठ मासातील ‘हे’ नियम पाळा अन्यथा दारात उभं राहील दुर्भाग्य !

Top Trending News    07-Jun-2025
Total Views |

jesht
 
28 मे पासून ज्येष्ठ महिन्याचा ( Jyestha Month Secrets ) प्रारंभ झाला आहे. आपल्या शास्त्रानुसार या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तीळ, पाणी दान करण्यास सांगितले जाते. या महिन्यात येणाऱ्या व्रत आणि सणांच्या अनुषंगाने पाणी, झाडे, वनस्पती यांचीही पूजा करावी. म्हणूनच या महिन्यात वटपौर्णिमा येते. विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. कदाचित पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव ठेवून ऋषी-मुनींनी या महिन्यातील व्रत आणि सणांची व्यवस्था केली असावी.
 
ज्येष्ठ महिना का म्हटले जाते ?
 
हिंदू कॅलेंडरनुसार हा वर्षातील तिसरा महिना आहे. या महिन्याचा स्वामी मंगळ असल्यामुले ज्येष्ठ नक्षत्र पौर्णिमा तिथीशी ( Jyestha Month Secrets ) जुळते म्हणून या महिन्याला ज्येष्ठ महिना म्हणतात. प्राचीन गणनेनुसार, या महिन्यातील दिवस मोठे असतो. इतर महिन्यांपेक्षा मोठा मानले जातात. संस्कृतमध्ये याला ज्येष्ठ म्हणतात. त्यामुळे या महिन्याचे नाव ज्येष्ठ पडले.
 
हे नियम महत्वाचे
 
या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करावे. तसेच, या महिन्यात पाणी दानला महत्व आहे. या महिन्यात पाण्याचा अपव्यय केल्याने वरुण दोष होतो, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा. शास्त्रानुसार या महिन्यात दिवसा झोपणे वर्ज्य आहे. तुम्हाला कोणतीही शारीरिक समस्या असल्यास तुम्ही थोडा वेळ लोटू शकता. आयुर्वेदानुसार शरीरात वात आणि उष्णता वाढते त्यामुळे महिनाभर वांगी खाऊ नये.
 
महाभारताच्या ( Jyestha Month Secrets ) अनुशासन पर्व असे सांगते की जेष्ठ महिन्यात एकदाच भोजन करतो. तो व्यक्ती कायम श्रीमंत आणि निरोगी राहतो. या महिन्यात तिळाचे दान करणे खूप फलदायी मानले जाते, त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तर, ते आपणास चांगल्या आरोग्याचे वरदानही देतात. मंगळ हा ज्येष्ठ महिन्याचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये हनुमानजींच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे. या महिन्यात हनुमानाची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात.