Rahul Election Row : महाराष्ट्राचे राजकारण राहुल गांधींना जाते आहे भारी ? म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक चोरीला

Top Trending News    08-Jun-2025
Total Views |

rahul 
दिल्ली - ( Rahul Election Row ) काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निवडणुकीवरुन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चोरल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पाच स्टेप्समध्ये निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बुथ रिगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवल्याचा आरोप केला आहे. तसेच आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
 
फिक्स झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपांवरुन आता मोठा गदारोळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार 2024 मधील लोकसभा निवडणुकीत आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी आग्रहाने सहभाग नोंदवला. याचा चांगला फायदा असा झाला की, मरगळलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी धावून धावून पक्षाचे काम केले. इतकेच नव्हे तर यामुळे राहुल गांधी यांचे महाराष्ट्रावरचे प्रेम अधोरेखित झाले. काहींच्या मते महाराष्ट्रातील राजकारण राहुल गांधींसाठी ( Rahul Election Row ) भारी चालले आहे.
 
राहुल यांच्यावतीने महायुतीवर वार करण्यात आल्यानंतर भाजपानेदेखील त्यांच्यावर टीका करणे सोडले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले की, एवढ्या मोठ्या पदावर बसलेला नेता हलक्याफुलक्या गोष्टी बोलतो तर त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे समजत नाही.
 
महाराष्ट्रात किरकोळ फसवणूक नाही तर निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी हेराफेरी ( Rahul Election Row ) आहे. 2023 मध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या निवडीत बदल केले, ज्यामध्ये आता सरन्यायाधीशांच्या जागी एका केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोगाला निष्पक्ष राहणे कठीण झाले, असे राहुल गांधी म्हणाले. प्रत्येक जागरूक भारतीयाने विचार करून निर्णय घ्यावा आणि उत्तरे मागितली पाहिजेत. कारण महाराष्ट्रातील या मॅच फिक्सिंगची आता बिहार आणि नंतर इतर ठिकाणी पुनरावृत्ती होईल. जेथे भाजपा हरण्याची शक्यता ( Rahul Election Row ) असेल, असे ते म्हणाले.
 
काय म्हणाले विरोधी पक्षनेते ?
 
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले की, निवडणूक कशी चोरी होते ? 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीला हानी पोहोचवण्यासाठी एक सुनियोजित योजना होती. हे सर्व कसे घडले ते टप्प्याटप्प्याने समजून घ्या.
 
स्टेप 1 : निवडणूक आयोगाची नियुक्ती करणाऱ्या पॅनेलशी छेडछाड करणे
स्टेप 2 : मतदार यादीत बनावट नावे जोडणे
स्टेप 3 : मतदानाची टक्केवारी वाढवणे
स्टेप 4 : भाजपाला जिंकण्यासाठी जिथे गरज होती तिथे बनावट मतदान करणे
स्टेप 5 : पुरावे लपवणे
 
राहुल, झोपेतून जागे व्हा
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपाने आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करत त्यांच्यावर मतदारांचा अपमान केल्याचा आरोप केला. फडणवीस म्हणाले की, राहुल यांनी बिहार निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला आहे. जोपर्यंत राहुल जमिनीवर उतरून वस्तुस्थिती समजून घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पक्ष पराभूत होत राहील. राहुल यांना झोपेतून जागे व्हावे लागेल. ते मतदारांचा अपमान करत आहेत. राहुल यांना ते काय बोलत आहेत ( Rahul Election Row ) याची काहीच कल्पना नाही.
 
राऊत यांनी दिला पाठिंबा
 
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या विधानाचे समर्थन केले आणि म्हटले की, महाराष्ट्र निवडणूक हायजॅक झाली. भाजपा आणि मोदींनी मिळून निवडणूक हायजॅक केली. आघाडी सरकार आले असते तर अदाणींचे प्रकल्प रद्द झाले असते, म्हणून महाराष्ट्र निवडणूक बोगस मतदारांसह हायजॅक करण्यात आली.
 
निवडणूक आयोगाने दावा फेटाळला
 
काँग्रेस नेत्याच्या विधानावर निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीवर केलेले निराधार आरोप कायद्याच्या राज्याचा अपमान आहेत. निवडणूक आयोगाने याआधी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात सर्व तथ्ये स्पष्ट केली होती, जी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. असे दिसते की, वस्तुस्थिती पूर्णपणे दुर्लक्षित करून असे मुद्दे पुन्हा पुन्हा उपस्थित केले जात आहेत. कोणीही पसरवलेली कोणतीही चुकीची माहिती ही कायद्याचा अनादर ( Rahul Election Row ) करण्याचे प्रतीक आहे.
 
बिहारमध्ये वेगळीच स्थिती
 
दुसरीकडे मात्र बिहारमध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपाच्या विरोधात जन सुराज पक्षाची फळी काम करते आहे. येथील जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. हे दोन्ही नेते फक्त निवडणुकीच्या वेळी बिहारमध्ये येतात, निवडणुका संपताच त्यांचे दौरेही संपतात, असे प्रशांत किशोर म्हणाले. 'बिहार बदलाव यात्रा' अंतर्गत सारण जिल्ह्यातील परसा आणि सोनपूर येथे जाहीर सभांना संबोधित केल्यानंतर पीके यांनी राहुल यांच्या बिहार दौऱ्यावर जोरदार हल्लाबोल ( Rahul Election Row ) केला.
 
राहुल गांधींना फक्त निवडणुकीच्या वेळी बिहारची आठवण का येते ? राहुल येथे येतात आणि बिहारच्या समस्यांबद्दल बोलतात, पण ते कधी येथील कोणत्याही गावात एक रात्रही राहिले आहेत का ? आज ते बिहारमध्ये येऊन कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलत आहेत, म्हणून मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की जेव्हा ते दिल्लीत काँग्रेसचे राजपुत्र होते तेव्हा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे जंगलराज होते. त्यावेळी त्यांना बिहारमध्ये गुन्हेगारी दिसली नाही. काही काळापूर्वी महागठबंधन सरकार होते ज्यामध्ये त्यांचा पक्षही सहभागी होता, तेव्हा त्यांना बिहारमध्ये गुन्हेगारी दिसली नाही. विरोधी पक्षात असतानाच त्यांना बिहारच्या समस्या का दिसतात आणि सत्तेत येताच ते सर्व काही का विसरतात?, असा सवाल प्रशांत किशोर ( Rahul Election Row ) यांनी केला.