Sexual Exploitation : शेत दाखविण्याच्या बहाण्याने गोठ्यात मैत्रिणीवर साधली संधी, आता भोगाव्या लागणार नरकयातना

Top Trending News    08-Jun-2025
Total Views |

sexu
 
नागपूर - ( Sexual Exploitation ) एका युवकाने आपल्या 17 वर्षीय मैत्रिणीला दुचाकीवर बसवून शेतात नेले. शेतात नेण्यासाठी एका मित्राने त्याला मदत केली. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. कुणालाही सांगितल्या जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात दोन्ही युवकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी सत्र न्यायालयाने बलात्कार करणा-या युवकाला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून, आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला. आशिष सुरेश नारनवरे (34) असे आरोपीचे नाव असून काटोल तालुक्यात राहतो. त्याचा मित्र रवींद्र माणिक सलाम (31) वर्षांचा असून, न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. न्यायालयात सरकारच्यावतीने अ‍ॅड. आसावरी पळसोडकर यांनी कामकाज ( Sexual Exploitation ) पाहिले.
काटोलमध्ये राहणारी पीडित मुलगी ही 17 वर्षांची होती. ती काटोल येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. घरीच आर्थिक हालाखिची असल्याने आईवडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ती एका कपड्याच्या दुकानामध्ये कामही करीत होती.
 
अतिप्रसंगाची ही घटना ऑगस्ट 2022 मध्ये घडली. आरोपी आशिष नारनवरे हा काजलच्या महाविद्यालयासमोर तिला बघत उभा रहायचा. काही दिवस काजलचा पाठलाग केल्यानंतर अखेर काजलने हटकले. त्यानेही काजलची भेट घेऊन मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा आग्रह पाहून काजलने त्याला होकार दिला. तेव्हापासून एकमेकांसोबत ते बोलायला लागले. बोलता बोलता संवाद वाढला आणि भेटी वाढल्या.
 
दरम्यान, एक दिवस आशिषने काजलला शेत दाखविण्यासाठी जाण्याबाबत विचारले. तिनेही त्याला होकार दिला. त्याने काजलच्याच दुचाकीने स्वतःच्या शेतात नेले. तेथे त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, काजलने नकार दिला. ‘शेतात कुणीही नाही, नकार दिल्यास जीवे मारुन टाकेल’ अशी आशिषने तिला धमकी दिली. त्यानंतर आशिषने शेतातील गोठ्यामध्ये नेऊन काजलवर बलात्कार केला. शिवाय आईवडिलांना सांगितल्यास ठार मारेल अशी धमकी दिली. त्यामुळे भीती वाटल्यामुळे तिने यासंदर्भात कोणालाही काहीच सांगितले नाही. या घटनेनंतर काजलने आशिषसोबत बोलणे बंद केले. त्यानंतर मात्र, आशिषने वारंवार तिच्या दुकानावर येऊन काजलची माफी मागितली. तसेच आपले तुझ्यावर किती प्रेम आहे हे काजलला व्यक्त ( Sexual Exploitation ) करून सांगू लागला व तिला लग्नाचे आमिष दाखवू लागला.
 
4 डिसेंबर 2022 रोजी आशिष पुन्हा काजलला भेटला व तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून शेतात नेले. दुचाकी त्याचा मित्र रवींद्रने चालवली. शेतात गेल्यानंतर रवींद्र निघून गेला. त्यावेळी आशिषने काजलला लग्नाची मागणी घातली. तसेच शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता आशिषने तिला ठार मारण्याची धमकी देऊन लाकडी काठीने जबर मारहाण केली. त्यानंतर त्याने काजलशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मानसिक धक्क्यात असलेल्या काजलची प्रकृती बिघडली. त्याने काजलला काटोलमधील एका रुग्णालयात सोडले आणि पळ काढला. अखेर काजलने मावशीला बोलावून घेतले. तिच्या मदतीने रुग्णालयात उपचार घेतले आणि पोलिस ठाण्यात आशिषसह रवींद्र विरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी आशिष आणि रवींद्रला अटक केली. दोघांवरही बलात्काराचा ( Sexual Exploitation ) गुन्हा नोंदवला.
  
आरोपीला 10 वर्षे कारावास
 
आशिषला भादंवि कलम 376 (बलात्कार) अंतर्गत दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास तसेच कलम 324 (दुखापत करणे) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास आणि कलम 506 (धमकी देणे) अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात ( Sexual Exploitation ) आली आहे.
 
रवी सुटला
 
काजल आणि आशिष या दोघांना मित्र रवी सालाम याने दुचाकीने शेतात सोडले होते. ते दोघेही शेतातील गोठ्यात गेले आणि रवी हा तेथून निघून गेला. या गुन्ह्यात रवीची कोणतीही भूमिका नव्हती. रवी गुन्ह्यात प्रत्यक्षात सहभागी नव्हता, त्यामुळे त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. रवीकडून अ‍ॅड. राजेंद्र शाहू यांनी युक्तिवाद ( Sexual Exploitation ) केला.
 
लैंगिक शोषण 
 
 लैंगिक शोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दुर्बलतेचा फायदा त्या व्यक्तीसोबत सोबत जबरदस्तीने किंवा फसवणूकीने लैंगिक संबंध प्रस्थापित ( Sexual Exploitation ) करणे. आपल्यावर असलेल्या विश्वासाचा किंवा अधिकाराचा गैरवापर करून तिच्यावर अत्याचार करून आपली भूक भागविणे. यात दबाव देणे, फसवणूक करणे किंवा जबरदस्तीने लैंगिक फायद्यासाठी वापर करणे यांचा समावेश होतो. यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रासाला सुद्धा सामोरे जावे लागते. लैंगिक शोषण रोखण्यासाठी जनजागृती, कडक कायदे आणि पीडितांना मदत करणाऱ्या यंत्रणांची गरज आहे.