दिल्ली - ( Fadnavis Vs Gandhi ) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापविले आहे. महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला जात असल्याचे विधान करत राहुल गांधी यांनी मोठ्या हेराफेरी चा दावाही केला आहे. अशा येत्या काळात बिहारमध्येही विधानसभेच्या निवडणुका असून तेथेही असाच गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण राहुल गांधींच्या या ताज्या आरोपांनंतर, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे करून बिहारच्या भविष्यासाठीची मोठी रणनीती दर्शविली आहे. अर्थातच हा राजकीय सामना राहुल गांधींविरुद्ध देवेंद्र फडणवीस असा रंगण्याची चिन्ह आहेत. महत्त्वाचे म्हणजे बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला सुयश आल्यास येत्या काळात फडणवीस राष्ट्रीय पटलावर कर्तृत्व गाजविणारे नेते ( Fadnavis Vs Gandhi ) ठरू शकतात.
विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि बिहारचे राजकीय वातावरण प्रचंड वेगळे आहे. अशात महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे बिहारमध्ये स्वागत होईल की राज्यात घरवापसी याची प्रत्येकाला चिंता आहे. फडणवीसांचा बिहारच्या राजकारणात भाव ठिकाणा लागला तर भाजपाचे गणित जमेल अन्यथा राहुल गांधीं विरोधात उभे राहत असताना फडणवीस एकाकी पडण्याची शक्यताही राजकीय विश्लेषकांकडून ( Fadnavis Vs Gandhi ) वर्तवली जाते आहे.
फडणवीस विरुद्ध लालूप्रसाद यादव
बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव यांचा राजकीय व दहशत आजही मोठा मानला ( Fadnavis Vs Gandhi ) जातो. राष्ट्रीय जनता दल या त्यांच्या पक्षाची ताकद बिहारच्या अनेक विधानसभा काबीज करण्यासाठी पुरेशी ठरू शकते हे राष्ट्रीय राजकारणाला चांगलेच ठाऊक आहे इतकेच नव्हे तर ज्यांना सुराज्य पार्टीच्या माध्यमातून प्रशांत किशोर हे देखील बिहारच्या राजकारणात स्वतःचे नशीब आजमावणार आहेत अशात काँग्रेसच्या शक्तीला तडा देण्यासाठी भाजपाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड करणे हे निश्चितच महत्त्वाचे समजल्या जात आहे. अर्थातच या सर्व राजकीय वातावरणाचा अभ्यास करता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बिहारची निवडणूक निश्चितच टर्निंग पॉईंट ठरू शकतो देवेंद्र फडणवीस यांना केवळ राहुल गांधी यांचाच सामना करावा लागेल असेही नसून त्या पाठोपाठ त्यांना लालूप्रसाद यादव या मातब्बर नेत्याचाही मुकाबला ( Fadnavis Vs Gandhi ) करावा लागणार आहे.
भाजपचा एक भाग 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी या रणनीतीकडे एक चाचणी म्हणूनही पाहत आहे. भाजपाने अधिकृतपणे त्याची घोषणा केलेली नसली तरी मोदींनंतर पुढचा पंतप्रधान कोण असेल याचे उत्तर म्हणूनही हे पाहिले जाऊ शकते असे त्यांचे मत आहे. परंतु राहुल गांधींविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांना ज्या पद्धतीने उभे केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीस यांची भूमिका भाजपाच्या सर्व मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळी आणि मोठी आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना इतर भाजपा मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे आणि खास होते. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, हिंदी, इंग्रजी आणि मराठीवर समान प्रभुत्व असण्यासोबतच देवेंद्र फडणवीस ( Fadnavis Vs Gandhi ) यांचे एक बलस्थान म्हणजे ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.
अलिकडच्या काळात त्यांची देशभरात स्वीकारार्हता वाढल्याचेही दिसून आले आहे. कदाचित यामुळेच भाजपाने पहिल्यांदाच राहुल गांधींविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांना अधिकृतपणे उभे केले आहे आणि राहुल गांधींसमोरील भविष्यातील आव्हानही तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस ( Fadnavis Vs Gandhi ) यांनी त्यांच्या पहिल्या राष्ट्रीय पावलात आक्रमक पण संतुलित पद्धतीने राजकीय उत्तर दिले आहे, त्यावरून त्यांनी हे स्पष्ट केले आहे की ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संरक्षणाखाली त्यांच्या भविष्याची तयारी करू इच्छितात. सध्या त्यांना त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेबद्दल कोणतीही घाई नाही. हेच कारण आहे की जरी ते विरोधी पक्षनेते राहुल गांधींना उत्तर देत होते. पण ते त्यांचा संदर्भ महाराष्ट्राबाहेर घेत नव्हते. हे त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचे प्रदर्शन देखील आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारचे राजकारण कायमच राष्ट्रीय पातळीच्या बरोबरीचे समजल्या गेले. राजकीय विश्लेषकांच्या मते या दोन्ही राज्यातील विधानसभा आगामी काळातील भारताचे नेतृत्व ठरवतात परिणामी, देवेंद्र फडणवीसन सारखा चेहरा हा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाला दावासा वाटला यात फडणवीसांचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होते आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे राज्य असून देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रीय नेतृत्व हे केरळ कर्नाटक तामिळनाडू सारख्या राज्यांना भारतीय जनता पार्टीच्या दिशेने वळविण्यासाठी देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे फडणवीसांना राष्ट्रीयत्व प्रदान करून आगामी काळात कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ सारख्या राज्यांची देखील जबाबदारी दिला जाऊ शकते असे देखील काही राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे एकंदरीतच हा चेहरा आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या भविष्याच्या दृष्टीने मोलाचा मानला जाणार हे निश्चित. निवडणुकीत फडणवीसांचा शिक्का चालला ( Fadnavis Vs Gandhi ) तर त्याचा राज्यालाही फायदा होऊ शकतो.