मुंबई - ( Vat Purnima Vrat ) सध्या जनसामान्यांना सोशल मीडियाचे अक्षरश: वेड आहे. एखादी घटना घडायचाच अवकाश की ती वायुवेगाने व्हायरल होते. उत्साही महिलासुद्धा रिल्स बनविण्यात दंग होतात. सेल्फीचाही मनमुराद आनंद लुटतात. अगदी गमतीने बोलायचे म्हणजे काहींचा उत्साह पतीसारखाच सात जन्म पुरेल एवढा दीर्घ असतो. महत्त्वाचे म्हणजे या उत्साहाच्या नादात बरेचदा सत्य, मिथ्याची बेमालूम सरमिसळ होते. पण एकच गोष्ट वारंवार कानावर येत असेल तर शेवटी त्याची शहानिशा न करता समुदाय त्यावर विश्वास ठेवायला लागतो. आज सर्वत्र वटपोर्णिमेचा सण साजरा होणार आहे. अशा वेळी सोशल मीडियावर देखील त्याची छटा दिसून येणार हे निश्चित. हा सण साजरा करणे योग्य की अयोग्य, केवळ स्त्रियांनीच का साजरा करावा, सौभाग्य म्हणजे आपला जोडीदार आपल्यासोबत अखंड असावा ही कामना केवळ बायकांनीच व्यक्त करावी का, अशी मतमतांतरे सुरु झाली आहेत. त्या पृष्ठभूमीवर अभ्यासकांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. अभ्यासक म्हणाले, रामायण, महाभारताप्रमाणे वटसावित्रीची कथा ( Vat Purnima Vrat ) ही परीकथा किंवा काल्पनिक गोष्ट नव्हे तर सत्यकथा व इतिहास आहे.
दीर्घायुष्याचं प्रतीक
मुळात विज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या तर्काचे समाधान होणे शक्य नसले तरी, आपली सकारात्मक कृती सुरु ठेवल्यास नकारात्मक बाबी हळूहळू नाहीश्या होतात. सणांचे स्वरुप काळानुरुप बदलते, पण ते नष्ट होत नाही. याच नाही तर प्रत्येक कुळ, प्रथा, उत्सव, सणामागे समाजकारण, मानसिकता, पर्यावरण, आध्यात्मिक बैठक, आरोग्य आणि व्यवसायाचा मोठा भाग आहे. आधुनिक विचारांनी त्याची कास सोडली तरी ते सुटणार नाही, वेगळया पध्दतीने पुढे येतील. पारंब्यांचे वरदान असलेला अक्षयवृक्ष वड दीर्घायुष्याशी संबंधीत ( Vat Purnima Vrat ) आहे. मूळात ब्रम्ह, पानाफांद्यात विष्णू व टोकावर शंकराचे अधिष्ठान आहे. पाच वडांचा वास असलेली पंचवटी पवित्र स्थान आहे. ज्यावेळी पृथ्वीवर प्रलय झाला तेव्हा मार्कंडेय ऋषींना भगवान श्रीकृष्णाने वडाच्या पानावर बालरूपात दर्शन दिले. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||, असे त्यांनी सांगितले.
निसर्ग संवर्धनाची दृष्टी जागवा
सदाहरीत वडाची पूजा ( Vat Purnima Vrat ) करण्यामागे निसर्गाप्रती जागरुकतेचा भाग असावा. निसर्गपूजन म्हणून वडपूजेकडे बघायला हरकत नाही पण त्याहीपेक्षा भीतीची प्रखर भावना व पूजा न केल्यास समाज काय म्हणेल याच चिंतेपोटी पूजन केले जाते हे दुर्दैव आहे. दुट्टपी मानसिकता सोडून, निसर्गाच्या संवर्धनासाठी सणांकडे वेगळया दृष्टीने बघण्याची निकड पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली. वड हा प्राणवायू देणारा वृक्ष आहे. तो आपल्या प्रत्येकाला जगवितो नव्हे तर सुदृढ आरोग्य प्रदान करतो. त्यामुळे त्याचे धन्यवाद माना व सुखी संसारासाठी प्रार्थना करा.
तुम्हालाही वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रतासाठी काय करावे, हा प्रश्न पडत असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे असे म्हणायला हरकत नाही. कुणी नवविवाहिता माहिती घेत आहे तर, घरातील ज्येष्ठ महिला त्यांना मार्गदर्शन करतातच. एकूणच सध्या घराघरांत वटपौर्णिमेचे ( Vat Purnima Vrat ) आकर्षण व त्यानिमित्तचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे.
वटपौर्णिमा : सुवासिनींची सज्जता
वटपौर्णिमेनिमित्त ( Vat Purnima Vrat ) सुवासिनींकडून जंगी तयारी केली जाते. यासाठी प्रामुख्याने महिलांनी पारंपारिक मराठी ‘लूक’ धारण करणे महत्वाचे ठरते. त्यातल्या त्यात नवविवाहितांची पहिली वटपौर्णिमा असेल तर कायमस्वरूपी आठवणी साठी विविध बेत आखण्यात काही वेगळीच गंमत असते. पूजेसाठी आवश्यक असलेल्या सामग्रीत रेशीम धागे, हळद-कुंकू, आंबे, हरभरे, नारळ, कापूस, धूप, दिवा, वस्त्र, आंबा या सर्वच समावेश आवर्जून करावा. तसेच, वडाच्या झाडाला एक नवीन कोरे वस्त्र वाहने शुभ मानले जाते. त्यासोबत पूजेनंतर पाच सवाष्ण बायकांना फळाची ओटी देणे आवश्यक आहे. त्यानेच ही पूजा फळास येते. पारंपरिक पोशाख, विशेषतः साड्या आणि दागिने परिधान करून सजवलेले पूजेचे ताट तयार करून स्वच्छ आणि निर्मळ मनाने मनोभावे वडाची झाडाची पूजा करा. ती नक्कीस फलप्राप्ती ( Vat Purnima Vrat ) देईल.
वट पौर्णिमा तारीख : 10 जून 2025
वट पौर्णिमा तिथी सुरू : सकाळी 11.35 वाजता
पौर्णिमा तिथी संपते : 11 जून दुपारी 1.13 वाजता
वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त : सकाळी 11.55 ते दुपारी 12.51 पर्यंत
या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे शुभ मानले जाते.
पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे.
निसर्गपूजन म्हणून वडपूजेकडे बघायला हरकत नाही पण त्याहीपेक्षा भीतीची प्रखर भावना व पूजा न केल्यास समाज काय म्हणेल याचसाठी पूजन केले जाते. सदाहरीत वडाची पूजा ( Vat Purnima Vrat ) करण्यामागे निसर्गाप्रती जागरुकतेचा भाग असावा.
ती नक्कीस फलप्राप्ती देईल.