नागपूर : ( Police To Rescue ) अरे धावा...वाचवा.. आम्ही बुडतोय...अशी ते याचना करीत होते. वेळीच कळमना पोलीस पोहोचले. कुटुंबातील सदस्य कंबरभर पाण्यात जीवनावश्यक वस्तू आणि गृहपयोगी साहित्य पाण्यावर तरंगत होते. पती, पत्नी आणि दोन मुले मदतीच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी मानवी साखळी तयार करून त्या कुटुंबाला बाहेर काढले. पोलिस वेळेवर पोहोचले नसते.
अहमदनगर येथील रहिवासी माया हाराळे ह्या पती आणि मुलांसह घरी होत्या. त्यांचे घर सिमेंटचे आहे. मध्यरात्री अचानक पावसाची तीव्रता वाढली आणि जवळच नाला असल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने संपूर्ण पाणी घरात शिरले. पाहता पाहता घरात कंबरभर पाणी घुसले. जीवनावश्यक वस्तू आणि गृहपयोगी साहित्य पाण्यावर तरंगत होते. त्यासोबत पिण्याचे पाणीही पाण्यात बुडाले. बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे अंगही थंडगार झाले ( Police To Rescue ) होते.
जीव वाचविण्यासाठी ते एकमेकांचा आधार घेत होते. धडधड वाढल्याने त्यांना तहाणही लागली. परंतु, सर्वत्र पाणीच पाणी असूनही त्यांना प्यायला सुद्धा पाणी नव्हते. काय करावे म्हणून त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला. नियंत्रण कक्षाने लगेच कळमना पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार आशिष चावरे, प्रफुल्ल गोवले आणि महाजन असे तिघे जण हारोळे यांच्या घरी पाण्याच्या बाटल्या घेवून पोहोचले. सर्वत्र पाणीच पाणी होते. संपूर्ण घर पाण्याने व्यापले होते. कंबरभर पाण्यात कुटुंब थंडीने कुळकुळत ( Police To Rescue ) होते.
पोलिसांनी मानवी साखळी तयार करून त्या कुटुंबातील चौघांनाही बाहेर काढले. मात्र, त्यांचे मन घरातील साहित्यात अडकून होते. जीव वाचविण्यासोबतच घरातील काही वस्तू सोबत घेवून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी आधी तुम्ही सुरक्षित व्हा, असा सल्ला दिला. ते सर्व तहाणेनी व्याकूळ झाले होते. पोलिसांनी सर्वांना पाणी दिले. तेवढ्यातच त्याचे नातेवाईक पोहोचले. पोलिसांनी चौघांनाही नातेवाईकांच्या स्वाधीन केले. वेळीच पोलिस पोहोचले नसते तर पाण्यात बुडून नव्हे तर तहाण आणि थंडीने कुडकूडत परिस्थिती हाताबाहेर ( Police To Rescue ) गेली असती.