Sanchar Sathi : हरवलेला मोबाईल मिळणार ? संचार साथी पोर्टलवर ‘डिजिटल सापळा’

Top Trending News    12-Jul-2025
Total Views |

sanchar sathi
 
 
दिल्ली : ( Sanchar Sathi ) अनेकदा आपण घाईघाईत आपला मोबाईल कुठेतरी विसरतो किंवा तो चोरीला जातो पण आता काळजी करू नका. सरकारने सुरू केलेल्या 'संचार साथी' पोर्टलवर ( Sanchar Sathi ) आता तुम्ही हरवलेला मोबाईल ट्रॅक करू शकता. आणि तोच मोबाईल तात्काळ ब्लॉकही करू शकता. या सुविधेमुळे मोबाईल चोरणाऱ्यांच्या गळ्याचा फास आवळला जाणार आहे. त्यामुळे, नागरिकांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत मिळणार आहे. दळणवळण मंत्रालयाकडून एक आकडा पुढे आला आहे, एका वर्षात 1,812 चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले आहेत. हे सर्व 'संचार साथी पोर्टल' आणि सीईआयआर सिस्टमद्वारे शक्य झाले आहे. जे मोबाईल ट्रॅक करण्याची आणि नेटवर्कवरून ब्लॉक करण्याची सुविधा प्रदान करते.
 
असे करा डाउनलोड
 
अँड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअर मधून तर आयफोन वापरकर्ते अ‍ॅपल स्टोअरमधून संचार साथी अ‍ॅप डाउनलोड ( Sanchar Sathi ) करू शकतात. आणखी दुसरा मार्ग म्हणजे संचार साथी वेबसाइटवर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून अ‍ॅपदेखील इन्स्टॉल करू शकता. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकून लॉगिन करावे लागेल. संचार साथी पोर्टलचा मुख्य उद्देश मोबाईल वापरकर्त्यांना सुरक्षा आणि सुविधा प्रदान करणे हा आहे. या द्वारे कुणीही त्याचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल फोन ब्लॉक आणि ट्रेस करू शकते. ते वापरकर्त्याला त्याच्या नावाने जारी केलेल्या सर्व सिम कनेक्शनची माहिती देते, यावरून बनावट कनेक्शन ओळखता येतील. याद्वारे वापरकर्त्याला आणखी एक सुविधा असते त्यांना नको असलेले कनेक्शन बंद देखील करता येते. एक महत्वाचे म्हणजे तुम्ही जुना फोन खरेदी करायला जाता तेव्हा पोर्टल तो खरा आहे की बनावट याची माहितीदेखील देतो.
 
सीईआयआर म्हणजे काय ?
 
सीईआयआर म्हणजेच सेंट्रलाइज्ड इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ही एक अशी प्रणाली आहे. जी आयएमईआय नंबरच्या आधारे चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ओळखते. तो नेटवर्कवरून ब्लॉक करते. ही प्रणाली सर्व भारतीय नेटवर्कवरून त्या मोबाईलचा आयएमईआय ब्लॉक करते. जर कोणी चोरीच्या मोबाईलमध्ये नवीन सिम टाकून वापरण्याचा प्रयत्न केला तर पोलिस त्या मोबाईलचे स्थान शोधू शकतात.
 
असा मिळेल फोन ?
 
संचार साथी अॅपवर ( Sanchar Sathi ) चोरीला गेलेला किंवा हरवलेला डिव्हाइस ब्लॉक करण्याचा पर्याय निवडा. संपर्क क्रमांक, आयएमईआय नंबर, ब्रँड आणि मॉडेल तपशील भरा. हरवलेल्या फोनचे स्थान आणि पोलिस तक्रार क्रमांक प्रविष्ट करा. तुमचे वैयक्तिक तपशील आणि आधार किंवा पॅन कार्ड अपलोड करा. विनंती सबमिट करा. आतापर्यंत, 1812 मोबाईल फोन मालकांना परत करण्यात आले. तर, 151 मोबाईल जून 2025 मध्ये परत मिळविण्यात यश आले आहे.