वॉशिंग्टन - ( US Debt Crisis ) अमेरिकेवरील वाढत असलेलं कर्जाचं सावट आता गंभीर वळण घेत चाललं आहे. आर्थिक धोरणांतील असंतुलन, व्याजदरांतील होणारी वाढ आणि महागाईमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत होऊ लागली आहे. देशाचे कर्ज 37 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचले आहे. मोठ्या कंपन्यांचे वेगाने दिवाळे निघत आहे. कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर परस्पर शुल्क लादले आहे. यामुळे सरकारचे उत्पन्न वाढेल आणि कर्जाचा डोंगर कमी होईल. पण, ही रणनीती खरोखर प्रभावी आहे का ? कारण, गेल्या सहा महिन्यांत अमेरिकेत 371 मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. मागील 15 वर्षात ही सर्वांत मोठी संख्या आहे.
या वर्षी औद्योगिक क्षेत्राला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले ( US Debt Crisis ) आहे. तर 58 कंपन्यांनी दिवाळखोरीचा मार्ग निवडला. तर 50 कंपन्या ग्राहकांच्या विवेकाधिकार क्षेत्रातील आहेत. 27 कंपन्या आरोग्यसेवा क्षेत्रातील आहेत. 2024 च्या पहिल्या सहामाहीत 335 कंपन्या दिवाळखोर झाल्या तर यावर्षी ही संख्या 371 वर पोहोचली. या वर्षी जूनमध्ये 63 कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केले होते तर मे मध्ये हा आकडा 64 होता. 2010 च्या सुरुवातीला पहिल्या सहामाहीत 468 कंपन्या दिवाळखोर झाल्या होत्या.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अशी योजना होती की परस्पर टॅरिफ मुळे परदेशी आयात थांबेल आणि अमेरिकन कंपन्यांना फायदा होईल. यामुळे सरकारला करांद्वारे अधिक उत्पन्न मिळेल. ज्यामुळे $37 ट्रिलियनचे कर्ज कमी होण्यास मदत होईल. परंतु, टॅरिफ मुळे अनेक कंपन्यांवरील खर्चाचा भार वाढतच चालला आहे. ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या त्याचा फटका सहन ( US Debt Crisis ) करत आहेत.
2024 मध्ये संपूर्ण वर्षात 688 मोठ्या कंपन्या दिवाळखोर झाल्या, ज्या 14 वर्षातील सर्वाधिक होत्या. त्यापूर्वी 2010 मध्ये 828 कंपन्या या संकटाला बळी पडल्या. जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत कामगिरी करत आहे तेव्हा हे सर्व घडत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प 'मेक इन अमेरिका'चा नारा देत आहेत, परंतु कंपन्यांची स्थिती पाहता हे धोरण तितकेसे प्रभावी ठरत नाही. 2023 मध्ये 324 कंपन्या आणि 2022 मध्ये 176 कंपन्या दिवाळखोर झाल्या, परंतु या वर्षीचा आकडा या सर्वांना मागे टाकत आहे. ट्रम्प यांचे 'मेक अमेरिका अगेन ग्रेट' चे घोषवाक्य प्रेरणादायी असू शकते परंतु प्रत्यक्षात कंपन्या बुडत आहेत. टॅरिफ आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे काही फायदा झाला आहे. त्याचा परिणाम लहान प्रमाणात ( US Debt Crisis ) होत आहे.