Trump Health Crisis : राष्ट्राध्यक्षांना रक्तवाहिन्यांचा विकार ? ट्रम्प यांच्या तब्येतीवर प्रश्नचिन्ह

Top Trending News    18-Jul-2025
Total Views |
 
trump
 
वॉशिंग्टन : ( Trump Health Crisis ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असतात. सध्या ते क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी (सीव्हीआय) नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. 79 वर्षीय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पायांना सूज आणि दुखापतीमुळे त्यांची तपासणी करण्यात आली. क्लीव्हलँड क्लिनिक रिपोर्टनुसार क्रॉनिक व्हेन्स इन्सफिशियन्सी (सीव्हीआय) ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये पायांच्या नसा रक्त योग्यरित्या हृदयाकडे परत वाहून नेण्यास असमर्थ असतात.
 
सहसा, नसांमध्ये लहान झडपा असतात ज्यामुळे रक्त हृदयाकडे जाते. जर या झडपा खराब झाल्या किंवा कमकुवत झाल्या तर रक्त खाली परत येऊ शकते आणि पायांमध्ये जमा होऊ शकते. यामुळे सीव्हीआयची स्थिती निर्माण होते. यामुळे पायांच्या नसांमध्ये दाब वाढतो. पायांमध्ये सूज येण्याव्यतिरिक्त अल्सर दिसू लागतात. हा आजार फार धोकादायक नाही, पण खूप वेदनादायक ( Trump Health Crisis ) असू शकतो.
 
व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, अध्यक्ष ट्रम्प यांना नियमितपणे हात हलवण्याच्या आणि अ‍ॅस्पिरिन वापरण्याच्या सवयीमुळे ही समस्या झाली आहे. ट्रम्प हृदयरोग टाळण्यासाठी अ‍ॅस्पिरिन घेतात. सीव्हीआय हा एक प्राणघातक आजार नाही, तर वय आणि काही सवयींमुळे होणारा एक मंद आणि जुनाट रक्तवाहिन्यांसंबंधीचा त्रास आहे. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराचा धोका जास्त ( Trump Health Crisis ) असतो.
 
उपचारांद्वारे ही समस्या पूर्णपणे बरी होऊ शकत नाही पण, ही समस्या नियंत्रित करणे शक्य आहे. नियमित चालणे, पाय उंच ठेवणे आणि निरोगी वजन राखणे यासारख्या जीवनशैलीतील बदलांद्वारे हा आजार नियंत्रित करता येतो. कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज घालल्याने नसांवर दबाव येतो, ज्यामुळे रक्त प्रवाह सामान्य होतो. प्रतिजैविके, रक्त पातळ करणारी औषधी आणि मेडिकेटेड रॅप्स यासारख्या औषधांनी हे नियंत्रित केले जाते. स्क्लेरोथेरपी म्हणजे इंजेक्शनद्वारे रक्तवाहिन्या बंद करणे, एंडोव्हेनस अ‍ॅब्लेशन आणि काही प्रकरणांमध्ये रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रिया देखील केली जाते. या आजाराचा उपचार रुग्णाच्या स्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून ( Trump Health Crisis ) असतो.
 
आजाराची महत्वपूर्ण लक्षणे
 
या आजारात सुरुवातीला पाय किंवा घोट्यांमध्ये सूज येणे, जडपणा किंवा थकवा जाणवणे, त्वचेवर खाज सुटणे किंवा मुंग्या येणे यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये, त्वचेचा रंग बदलू शकतो, जाड किंवा चामड्यासारखा होऊ शकतो आणि पायांमध्ये अल्सर किंवा जखमा देखील होऊ शकतात. जर वेळेवर उपचार केले नाहीत तर ही स्थिती खूप वेदनादायक आणि गंभीर होऊ शकते. सीव्हीआयच्या कारणांबद्दल बोलायचे झाले तर, जेव्हा रक्ताच्या गुठळ्या किंवा दुखापतीमुळे नसांमधील झडपा खराब होतात तेव्हा ही समस्या उद्भवते. वाढत्या वयानुसार, रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि ही समस्या उद्भवू लागते. जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे, लठ्ठपणा, गर्भधारणा, अनुवांशिक कारणे, धूम्रपान, कमी शारीरिक हालचाली आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या घटकांमुळे देखील हा आजार ( Trump Health Crisis ) होऊ शकतो.