Teacher Recruitment Scam : फसव्या शिक्षक भरतीवर सरकार आक्रमक ! पोलिसांची चौकशी आणि कारवाई दोन्ही निश्चित

Top Trending News    19-Jul-2025
Total Views |

tea 
 नागपूर : ( Teacher Recruitment Scam ) शालार्थ आयडी घोटाळ्याचे प्रकारानंतर शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. यात शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षकांची नियुक्ती करून शासनाचे पगार लाटल्याचा प्रकार समोर आला. नागपुरात हा प्रकार उघड झाला असला तरी राज्यभरात असे प्रकार घडल्याची चर्चा होत आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यानंतर शालार्थ आयडी देण्यासाठी विभागाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली. यात नवीन शालार्थ आयडी मंजूर करण्यासह जुन्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबत काय कारवाई करावी, हे ही स्पष्ट ( Teacher Recruitment Scam ) करण्यात आले आहे.
 
आता शिक्षण विभागाने शालार्थ आयडी देण्यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. यानुसार आता सर्व माहिती ई-ऑफिसवर टाकून वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ आयडी आदेश, संबंधित खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचाऱ्याचा रूजू अहवाल शालार्थ पोर्टलवर 30 ऑगस्टपर्यंत अपलोड करावे लागणार आहे. जर कागदपत्र या वेळेत अपलोड झाले नाही तर एकस्तर चौकशी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त एस.पी. सिंग यांनी दिले आहे. या वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास शासकीय निधीचा अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 
सर्व माहिती ई-ऑफिसला सादर 
 
7/7/2025 पूर्वी निर्गमित शालार्थ आयडी आदेशाबाबत (ता.18/11/2016 ते 7/7/2025) शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रदान केल्यानंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ आयडी आदेश प्रत, संबंधित खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचाऱ्याचा रूजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड करणेबाबत डीडीओ-1 तथा मुख्याध्यापक / प्राचार्य स्तरावरून कार्यवाही करणे अनिवार्य ( Teacher Recruitment Scam ) असेल.
 
7/11/2012 ते 18/11/2016 या कालावधीत शालार्थ आयडी आदेश निर्गमित केलेले नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याच्या खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल व वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे. या घोटाळ्याप्रकरणात नागपुरातील सदर व सायबर पोलिस ठाकण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चार आज-माजी शिक्षण उपसंचालक यांना अटक झाली आहे. त्याच प्रमाणे संस्था चालक, कर्मचारी, दलाल यांनाही अटक करण्यात आली आहे.