नागपूर : ( Teacher Extortion ) शिक्षण विभागात शिक्षण भरती घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडविली होती. असाच आणखी एक प्रकार पुढे आला आहे. शिक्षकाला नियमित वेतनश्रेणी लागू होताच मुख्याध्यापकांनी दरमहा 5% कमिशन आणि 20 लाख रुपयांसाठी शिक्षकाला त्रास देण्यास सुरुवात केली. शिक्षकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे जानेवारी 2025 पासून त्याचा पगार थांबवण्यात आला आणि त्याचे खाते गोठवण्यात आले. अखेर सारंगला उपजीविकेचा प्रश्न होता. अखेर कंटाळून शिक्षकाने मुख्याध्यापकांविरुद्ध पोलिसात तक्रार केली.
म्हाळगीनगर येथील रहिवासी सारंग चौधरी (43) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी मुख्याध्यापकाचे नाव विकास इंगोले असे आहे. तो अवधूतनगर येथील वंदे मातरम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक आहे. सारंग 2016 पासून तेथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी 2025 पासून त्याचा पगार थांबवण्यात आला त्यामुळे त्याला नाइलाजास्तव पोलिसात ( Teacher Extortion ) जावे लागले.
1 मार्च 2023 पासून संस्थेत सेवेत सातत्य लागू करण्यात आले आणि त्यांनी अनुदानावर काम सुरू केले. तेव्हापासून इंगोले त्यांच्याकडून पैशांची मागणी करत होता. त्याने सारंग यांच्याकडे कायमस्वरूपी नियुक्तीसाठी 20 लाखांची मागणीही केली होती. तर दरमहा त्याला त्याच्या पगाराच्या 5% रक्कम त्याच शाळेत काम करणा-या पुष्पा नावाच्या कर्मचा-यांच्या खात्यात जमा करण्यास सांगत होता. सारंग ऑक्टोबर 2024 पर्यंत पैसे जमा करत राहिला. त्यानंतर त्याने पैसे देणे बंद केले. तेव्हापासून इंगोले त्याला त्रास देऊ लागला. पोलिसांनी इंगोलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि तपास ( Teacher Extortion ) सुरू केला आहे.