लंडन : ( UK Cyber Attack ) आपण फोन आणि लॅपटॉपवरील पासवर्ड अत्यंत सावधगिरीने ठेवणे आवश्यक आहे. आपला पासवर्ड हॅक होऊ नये त्यासाठी तो अधिक स्ट्राँग ठेवावा. कारण, जर तो पासवर्ड हॅकरच्या हाती सापडला तर तो आपल्याला खूपच महाग पडतो. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या पुढे आहे. कमकुवत पासवर्ड ठेवल्यामुळे 158 वर्षे जुनी कंपनी अडचणीत आली असून ७०० जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहे. सायबर हल्ले हे वाढतच जाणार असल्यामुळे हा धोका आता राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला ( UK Cyber Attack ) आहे.
ही घटना यूकेमधील नॉर्थम्प्टनशायर येथील ( UK Cyber Attack ) वाहतूक कंपनी केएनपीसोबत घडली. ही कंपनी रॅन्समवेअर हल्ल्याच्या बळी ठरलेल्या हजारो कंपन्यांपैकी एक आहे. अलीकडेच अनेक मोठ्या कंपन्यांना सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. सहकारी संस्थेच्या सीईओने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की त्यांच्या 65 लाख सदस्यांचा डेटा चोरीला गेला आहे. हॅकर्सनी केएनपी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या पासवर्डचा अंदाज घेऊन कंपनीच्या सिस्टममध्ये घुसखोरी केली. त्यानंतर त्यांनी कंपनीचा सर्व डेटा लॉक केला. पुढे त्यातून अंतर्गत सिस्टम पूर्णपणे जाम केली. 2023 मध्ये केएनपीकडे 500 ट्रक होते, जे 'नाइट ऑफ ओल्ड' या ब्रँड नावाने चालत ( UK Cyber Attack ) होते.
कंपनीचं म्हणणं होतं की त्यांची आयटी सिस्टम उद्योग मानकांनुसार होती. त्यांनी सायबर हल्ल्यांपासून विमा देखील घेतला होता. परंतु 'अकिरा' नावाच्या हॅकिंग टोळीने सिस्टममध्ये घुसून कंपनीचा सर्व डेटा लॉक केला. कर्मचाऱ्यांना कोणतीही महत्त्वाची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे हॅकर्सनी ब्लॅकमेलिंग सुरू केले आणि डेटा परत हवा असेल तर त्याबदल्यात खंडणी मागितली. हॅकर्सनी कोणतीही रक्कम उघड केली नसली तरी, रॅन्समवेअरशी संबंधित एका विशेष फर्मने अंदाज लावला की ही रक्कम सुमारे 50 लाख पौंड (सुमारे 52 कोटी रुपये) असू शकते. केएनपीकडे इतके पैसे नव्हते आणि अखेर कंपनीला तिचा सर्व डेटा गमवावा लागला आणि परिणामी कंपनी बंद ( UK Cyber Attack ) झाली.
एम अॅण्ड एस सारखे मोठे ब्रँड देखील या सापळ्यात अडकले आहेत. हॅकर्स एका नवीनच प्रक्रियेचा वापर करीत आहे. यात हॅकर्स फसवणूक करून सिस्टममध्ये प्रवेश करतात. कंपनीचा डेटा चोरतात परिणामी ग्राहकांना डिलिव्हरी करण्यात विलंब आणि समस्या निर्माण होतात. एनसीएचे महासंचालक जेम्स बॅबेज म्हणतात की, आजचे तरुण हॅकर्स गेमिंगपासून सुरुवात करतात, नंतर कंपन्यांच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी या कौशल्यांचा वापर करतात. सिस्टममध्ये प्रवेश केल्यानंतर, ते डार्क वेबवरून खरेदी केलेल्या रॅन्समवेअरचा वापर करतात, जे कंपन्यांचा डेटा लॉक करते आणि खंडणीची मागणी करते.