US Ukraine Arms Deal : शस्त्रांचा खेळ पुन्हा सुरू ! अमेरिकेची युक्रेन सोबत 322 मिलियन डॉलर्सची शस्त्रडील

Top Trending News    24-Jul-2025
Total Views |

 US Ukraine
 
वॉशिंग्टन : ( US Ukraine Arms Deal ) अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी सांगितले की त्यांनी युक्रेनला त्यांचे हवाई संरक्षण वाढविण्यासाठी आणि बख्तरबंद लढाऊ वाहने पुरवण्यासाठी $ 322 दशलक्षच्या प्रस्तावित शस्त्र विक्रीला मान्यता दिली आहे. तसे तर, काही आठवड्यांपूर्वी, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी युक्रेनला शस्त्रे पुरवठा थांबवण्याचे निर्देश दिले होते. या महिन्याच्या सुरुवातीला अचानक भूमिका बदलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या अमेरिका युक्रेनला शस्त्रे पाठवत राहील, असे सांगितले आहे.
 
विशेष म्हणजे रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले असतांना अशा वेळी ही मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की काँग्रेसला संभाव्य विक्रीबद्दल माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले होते की, "आम्हाला हे करावे लागेल. त्यांना (युक्रेनला) स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम असले पाहिजे. त्यांच्यावर तीव्र हल्ला होत आहे. आम्ही त्यांना अधिक शस्त्रे पाठवत आहोत." ज्यामध्ये अमेरिकन बख्तरबंद वाहनांच्या पुरवठा, देखभाल, दुरुस्ती इत्यादीसाठी $150 दशलक्ष आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींसाठी $172 दशलक्ष समाविष्ट ( US Ukraine Arms Deal ) आहेत.