Admission Fraud : मेडिकल सीटचं स्वप्न... आणि 14 लाखांचा विश्वासघात !

Top Trending News    25-Jul-2025
Total Views |
 
Admission Fraud
 
मुंबई : ( Admission Fraud ) मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका महिलेची 14.5 लाखांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोहंमद वसीम, ऐनुल जैनुल हसन ऊर्फ रेहान आणि कृष्णमोहन शर्मा ऊर्फ निरज या तीन भामट्यांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला धोबीतलाव परिसरात राहते. तिची मुलगी तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे नीट परीक्षेसाठी ऑनलाईन तयारी करत होती. या काळात तिची मोहंमद वसीमशी ओळख झाली होती. मीही मेडिकलचा विद्यार्थी असून, मला रेहान आणि निरज यांनी प्रवेश मिळवून दिला होता, असे खोटे त्याने तिला सांगितले होते. आणि तिने त्याच्यावर विश्वास ( Admission Fraud ) ठेवला.
 
मोहंमद वसीम ( Admission Fraud ) याने तिलाही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतील, असे सांगून मोहंमदने त्या दोघांशी तिची ओळख करून दिली होती. मुलीने आईला हे सांगितल्यावर रेहान, निरजवर विश्वास ठेवून तिने मुलीच्या मेडिकल प्रवेशासाठी 14 लाख 40 हजार रुपये दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत मुलीला प्रवेश मिळाला नाही. विचारणा केल्यानंतर दोघेही पुढच्या वर्षी नक्की मिळेल, असे सांगत होते. वर्ष उलटूनही त्यांनी प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे परत केले नाही. त्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार केली. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर गुन्हे केल्याची शक्यता आहे.