Mother Turns Killer : आईनेच दिला विषाचा प्याला ! तीन निष्पाप जीवांचा अंत

Top Trending News    27-Jul-2025
Total Views |
 
crime
ठाणे : ( Mother Turns Killer ) ठाणे जिल्ह्याला हादरवणारी एक घटना घडली आहे. जेथे एका आईलाच आपल्या मुलांना ठार मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका २७ वर्षीय महिलेने घरगुती समस्यांमुळे अस्वस्थ होऊन असे केले असल्याचे सांगितल्या जात आहे. तिने तिच्या तीन अल्पवयीन मुलींना विष देऊन ठार मारल्याच्या आरोपाखाली शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलेला तिच्या पतीच्या मद्यपानाच्या सवयीसह घरगुती समस्यांचा सामना करावा लागत होता. ती महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि तिला तिच्या तीन मुलींची काळजी घेण्यात अडचणी येत होत्या, ज्यामुळे महिलेने हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या सासरच्यांना तीन मुलांच्या मृत्यूमध्ये तिचा सहभाग असल्याचा संशय होता, असे पोलिसांनी सांगितले. महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे जलदगतीने कारवाई करत पोलिसांनी मुलांच्या आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. शनिवारी पहाटेच्या सुमारास तिला अटक ( Mother Turns Killer ) केली.
 
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शाहपूर परिसरातील अस्नोली गावातील तळेपाडा येथील गृहिणी संध्या संदीप बेरे हिने २० जुलै रोजी वरण भातात मध्ये कीटकनाशक मिसळून ते तिच्या पाच, आठ आणि १० वर्षांच्या मुलींना खायला दिले. लवकरच मुलींना अस्वस्थ वाटू लागले त्यासोबतच उलट्या होऊ लागल्या आणि चक्कर येऊ लागली, त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल ( Mother Turns Killer ) करण्यात आले.
 
मुलींना रुग्णालयात दाखल ( Mother Turns Killer ) केल्यांनतर त्यांना दोघांपैकी एकाचा २४ जुलै रोजी आणि दुसरीचा २५ जुलै रोजी मृत्यू झाला, तर तिसऱ्या मुलीला नाशिकमधील रुग्णालयात रेफर करण्यात आले जिथे तिचाही २४ जुलै रोजी मृत्यू झाला. खिनावली पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. तर शनिवारी रात्री मुलींचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या शरीरात विष असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. महिलेला प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.